Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“उद्ध्वस्त कोकणातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तातडीने मदत करा!”

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे राज्य सरकारला साकडे

May 18, 2021
in घडलं-बिघडलं
0
madhav bhandari

मुक्तपीठ टीम

 

लागोपाठ दुसऱ्या वर्षी ऐन हंगामात आलेल्या भीषण चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी आणि लगतच्या जिल्ह्यांतील आंबा बागायतदारांचे कंबरडे पुरते मोडले असून केवळ कागदावरचे आदेश आणि घोषणा न करता आंबा बागायतदार व गरीब शेतकऱ्याच्या मदतीसाठी प्रत्यक्ष पॅकेज मिळाले पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्य सरकारकडे केली आहे. कोकणातील हापूस, कोकम, नारळीपोफळी आणि मच्छीमारी हे उत्पन्नाचे सर्व मार्ग तौत्के चक्रीवादळाने धुवून टाकले असून कोकणी अर्थव्यवस्थेस यापूर्वी कधीही नव्हता एवढा जबर फटका बसला आहे. कोकणाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातही आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले असून राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याना मदत देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही भांडारी यांनी केली आहे.

 

गेल्या वर्षी जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने कोकणातील शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला होता. राज्य सरकारने तेव्हा जाहीर केलेल्या मदतीपासून अजूनही असंख्य शेतकरी वंचितच असताना यंदा तौत्के वादळाने नवा जबर फटका दिल्याने आंबा उत्पादक, मच्छीमार आणि शेतकऱ्यास सावरणे अशक्य झाले आहे. उद्ध्वस्त कोकणास पुन्हा उभे करण्यासाठी केवळ कागदी आदेश आणि घोषणा पुरेशा नसून आता त्याला थेट मदत मिळाली पाहिजे, व राज्य सरकारने आढावा घेण्यात वेळकाढूपणा न करता तातडीने मदतीचे वाटप करून शेतकऱ्यास दिलासा दिला पाहिजे, असे भांडारी यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

 

तौत्के वादळामुळे झालेल्या हानीमुळे किमान पाच वर्षे शेतकऱ्यास डोके वर काढता येणार नाही. मच्छीमार कुटुंबांनाही मोठे नुकसान सोसावे लागले आहे. किनारी भागातील असंख्य घरेदारे, गोठे उद्ध्वस्त झाले आहेत, तर मच्छीमारांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या नौकाची हानी झाली आहे.

 

आंबा-कोकम-काजू, नारळ-पोफळी आणि मच्छीमारी तसेच पर्यटन व्यवसायावर जगणाऱ्या कोकणी माणसासाठी राज्य सरकारकडे कसलेही धोरण नाही, उद्योगांना मदत करण्याची कोणतीही योजना नाही आणि कोकणच्या नियोजनबद्ध विकासाचे कोणतेही मॉडेल सरकारने आखलेले नाही.

 

एकीकडे निसर्गाचा प्रकोप आणि राज्य सरकारची डोळेझाक यांमध्ये कोकणातील शेतकरी भरडला जात आहे. संकटावर मात करण्याची जिद्द त्याच्याकडे आहे, पण त्यासोबत त्याला आता सरकारी दिलाशाची गरज आहे. गेल्या वर्षीपासूनची कोरोनामुळे टाळेबंदी आणि वादळाचा तडाखा अशा दुहेरी संकटात त्याला हात देण्यासाठी सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणीही भांडारी यांनी केली आहे. राज्याच्या अन्य भागांतील नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांप्रमाणेच, कोणताही भेदभाव न करता कोकणासाठीही राज्य सरकारने मदतीचा हात दिला पाहिजे, असे ते म्हणाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास कर्जावरील व्याजमाफी, वीजबिल माफी आणि कर्जफेडीस मुदतवाढ मिळाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


Tags: BJPKonkanmadhav bhandariMaharashtratauktae cycloneतौक्ते चक्रीवादळभाजपामहाविकास आघाडी सरकारमाधव भांडारीराज्य सरकार
Previous Post

#मुक्तपीठ मंगळवारचे वेचक वेधक बातमीपत्र

Next Post

“कोकणातील उन्मळून पडलेल्या फळ झाडांचे शास्त्रोक्त पुनर्जीवन करा”

Next Post
ashish shelar

"कोकणातील उन्मळून पडलेल्या फळ झाडांचे शास्त्रोक्त पुनर्जीवन करा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!