Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कोकणातील उन्मळून पडलेल्या फळ झाडांचे शास्त्रोक्त पुनर्जीवन करा”

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

May 18, 2021
in घडलं-बिघडलं
0
ashish shelar

मुक्तपीठ टीम

 

कोकणपट्टीवर व सह्याद्री नजीकच्या पट्ट्यामध्ये फळ बागांना विशेषतः आंबा नारळ केळी आदी वृक्षांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. हजारो झाडे उन्मळून पडलेली आहेत. त्यामुळे शेकडो बागायतदारांचे अतोनात नुकसान झालेले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या सर्व शेतकऱ्यांना तत्काळ मदत करून उन्मळून पडलेली झाडे त्याच ठिकाणी शास्त्रोक्त प्रयत्नाने उभी करण्याबाबत शासनाने विशेष प्रयत्न करावेत याकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी लक्ष वेधले आहे.

 

आमदार अँड आशिष शेलार यांनी याबाबत लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,

गेली दोन दशके मुंबईतच नव्हे तर जगभरच्या वृक्ष लागवडीच्या व त्यानंतर घडणाऱ्या वादळाच्या नुकसान दुरुस्तीची एक पद्धत उपलब्ध आहे. त्या तंत्रज्ञानाद्वारे उन्मळून पडलेल्या झाडांची मुळे स्वच्छ करून व झाडांची तुटलेल्या फांद्या आणि पाने यांची योग्य ती छाटणी करून ती झाडे पुन्हा उभी करता येतात. त्यासाठी दाभोळकर तंत्रज्ञानच्या मदतीने ४ x ४ फूट अथवा जेवढी झाडांच्या मुळांची खोली उपलब्ध असेल त्या खोलीचा खड्डा खोदून, त्यातील पाणी काढून त्यात डी ऑईल्ड निमकेक चांगली लाल माती, आणि त्या भागात असलेल्या वनराईची वाळलेली पाने आणि काटक्या त्याचे स्तर रचून एका सपोर्टच्या मदतीने झाड उभे करण्यात येते. त्यानंतर त्याला दर आठवड्याला तीन ते पाच लिटर अथवा झाडाच्या बुंध्याचा अंदाज घेऊन आवश्यक तेवढे पाणी देण्यात येते. हे दिल्यानंतर झाडाची मुळे विशेषतः आंब्याची मुळे आपोआप जमिनीत रुजतात व पहिल्या वर्षीच पाने यायला सुरुवात होतात आणि दोन ते तीन वर्ष्यात उत्पादन सुरू होते. म्हणजे पाच वर्ष्याच्या आत त्याच्या पूर्व क्षमतेच्या ५०% अंदाजे उत्पादन होऊ शकते आणि दरवर्षी उत्पादन वाढत जाते. हे तंत्रज्ञान वापरताना कृषी विद्यापीठतील व मुंबई महानगर पालिकेतील उद्यान विभागाच्या तज्ञांना प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक दाखवावे लागेल आणि त्यानंतर त्याला आवश्यक असलेले फोर्स लिफ्टस आणि क्रेन या तातडीने तिथे हलवून ते काम तीन ते सात दिवसात वादळ थांबल्यानंतर सुरू करणे आवश्यक आहे. याद्वारे आंबा, नारळ, काजू व इत्यादी अनेक फळ झाडांना आपण पुनर्जीवित करू शकू.

 

तौक्ते वादळाने कोकणातील झाडांचे प्रचंड मोठी हानी झाली असून शेतकरी उध्वस्त झालाय. त्यामुळे शासनाकडून तातडीने मदत मिळणे तर आवश्यक आहेच. शिवाय काही झाडे शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्जीवित करण्यासाठी शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याची विनंती मा. मुख्यमंत्र्यांना केली आहे. pic.twitter.com/tS3eAnFfuN

— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 17, 2021

 

आज या प्रत्येक झाडाचा उभं करण्याचा खर्चाचा अंदाज देणं कठीण आहे पण अवघ्या तीन ते पाच हजार रुपयात जे झाड शेतकऱ्यांना पुन्हा फळ देणारे ठरेल. तसेच हे काम शेतकऱ्यांना मानसिकदृष्टया शक्ती देण्यासारखे ठरेल. म्हणून यासाठी तात्काळ टास्क फोर्स निर्माण करण्यात यावी. ज्यामध्ये कोकण कृषी विद्यापीठ, मुंबईतील खाजगी संस्था ज्या या काम करतात आणि मुंबई महानगरपालिका या संस्थांचा हा गट तयार झाला आणि जागोजाग जर त्यांनी प्रात्यक्षिक केली तर १५ दिवसामध्ये नवीन उत्साहमध्ये शेतकरी कामाला लागेल.

 

त्यामुळे तज्ञ समितीची स्थापना करून या कार्यास तीन दिवसांच्या आत मार्गी लावावे अशी विनंती, आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे.

 


Tags: ashish shelarBJPchief minister uddhav thackerayअँड आशिष शेलारभाजपामुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

“उद्ध्वस्त कोकणातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तातडीने मदत करा!”

Next Post

“खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या”

Next Post
chandrakant patil

"खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!