Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यंत्रमागधारकांना वीजदरात सवलत मिळण्यासाठी अर्ज करण्यास ३१ मेपर्यंत मुदत

March 5, 2021
in घडलं-बिघडलं
0
Shital Ugale

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंर्तगत वीजदर सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांसाठी आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली असून आता अंतिम मुदत ३१ मे २०२१ ही आहे. तसेच २७ अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग धारकांना ऑफलाईन अर्ज करण्याची मुभा देण्यात आहे. त्यामुळे वीजदर सवलत मिळण्यासाठी यंत्रमागधारकांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्तालयाने केले आहे.

वस्त्रोद्योग आयुक्तालयाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, राज्य शासनाच्या राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे. वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या https://www.dirtexmah.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून आता अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मे २०२१ पर्यंत आहे. तसेच २५ फेब्रुवारी २०२१च्या शासन निर्णयानुसार, २७ अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग धारकांना नोंदणीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन यापैकी कुठल्याही प्रकारे अर्ज करता येणार आहे. ऑफलाईन अर्ज करणाऱ्या यंत्रमागधारकांनी वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरील अर्ज डाऊनलोड करून वस्त्रोद्योग आयुक्त, महाराष्ट्र राज्य, सिव्हिल लाईन्स, नागपूर या ठिकाणी पाठवावेत, असे वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली – उगले यांनी कळविले आहे.


Tags: electricity ratesMachine ownersमहाराष्ट्र वस्त्रोद्योग धोरणयंत्रमागधारकवीजदर सवलत
Previous Post

“विकास निधी वाटपात कोणत्याही विभागावर अन्याय होऊ देण्यास नाही”

Next Post

बापरे…सोन्याच्या दरात एवढी मोठी घसरण कशी?

Next Post
gold

बापरे...सोन्याच्या दरात एवढी मोठी घसरण कशी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!