मुक्तपीठ टीम
भारतीय बाजारात नवनवीन कार्सची सातत्याने मागणी वाढत असते. छोट्या कार्सची भारतात नेहमीच मोठी क्रेझ असते. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या वाहनांची कमी किंमत आहे. काही कार्स अशा ही आहेत ज्यांची भारतात किंमत खूपच जास्त आहे परंतु, दुबईमध्ये या कार्ससाठी खूप कमी पैसे मोजावे लागतात. या महागड्या कार्सच्या यादीत मॅक्लारेन जीटी, रोल्स रॉयस, रेंज रोव्हर, मर्सिडिझ आणि बेंटलेच्या गाड्यांचा समावेश आहे.
लक्झरी कार्स मुंबईत महाग, दुबईत किती स्वस्त? जाणून घ्या
१. २०२३ लँड रोव्हर रेंज रोव्हर
- २०२३ लँड रोव्हर रेंज रोव्हर ही कार तिच्या जुन्या मॉडेल्सपेक्षा खूपच वेगळी आहे.
- यामध्ये एलईडी लाईट्स आणि एलईडी डीआरएल देखील पाहायला मिळतात.
- भारतात या कारची किंमत १.६४ कोटी आहे, तर दुबईमध्ये या कारची किंमत १.१२ कोटी रुपये आहे.
२. रोल्स रॉयस कुलीनन
- रोल्स रॉयस कंपनीची रोल्स रॉयस कुलीनन ही एसयूव्ही रोल्स रॉयस घोस्ट आणि फॅंटन VIII दरम्यान लॉंच करण्यात आली आहे.
- भारतात या कारची किंमत ७.२ कोटी रुपये आहे, तर दुबईमध्ये या एसयूव्हीसाठी २.८ कोटी रुपये खर्च करावे लागतील.
३. मॅक्लारेन जीटी
- मॅक्लारेन जीटी ही कार भारतात पोहोचणारी पहिली मॅक्लारेन जीटी स्पोर्ट्स कार आहे.
- हे पूर्णपणे बिल्ड युनिट आहे आणि भारतात या कारवर ११० टक्के कर लावला जातो.
- भारतात या कारची किंमत ३.७२ कोटी रुपये आहे, तर दुबईमध्ये त्याची किंमत १.९४ कोटी रुपये आहे.
४. बेंटले बेंटायगा डब्ल्यू१२
- बेंटले बेंटायगा डब्ल्यू१२ ही कार भारतात विक्रीसाठी उपलब्ध नाही.
- ही कार अंबानी कुटुंबाने पहिल्यांदाच खरेदी केली होती.
- या कारचे इंजिन खूप शक्तिशाली आहे आणि त्याचा पॉवर आउटपुट ६०० बीएचपी पॉवर आणि ९०० एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकते.
- भारतात या कारची किंमत ४.१२ कोटी रुपये आहे.
- दुबईत ही कार फक्त २.३२ कोटी रुपयांमध्ये मिळेल.
५. मर्सिडिझ-एएमजी जी६३
- मर्सिडिझची, एएमजी जी६३ ही एसयूव्ही भारतात खूप पसंत केली जाते.
- या कारचे इंजिन ५८५ बीएचपीची शक्ती आणि ८५० एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकते.
- भारतात या कारची किंमत २.७ कोटी रुपये आहे तर दुबईमध्ये याची किंमत १.७ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.