Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना विमान तिकीट बुकिंगवर मिळणार फायदे, एलटीसीचे नवे नियम जारी

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
LTC New Rules

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारने फ्लाइट तिकीट बुकिंगबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. संचार मंत्रालयाच्याअंतर्गत असलेल्या पोस्ट विभागाने या संदर्भात एक ऑफिस मेमोरँडम जारी केला आहे. तर, हवाई तिकीट बुकिंग एजंट, फ्लाइट तिकीट भाडे, वेळ मर्यादा यांच्या संदर्भात लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन म्हणजेच एलटीसीने नियम स्पष्ट केले आहेत. केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड, बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड आणि अशोक ट्रॅव्हल्स अँड टूर्स या तीन बुकिंग एजंट्सकडून विमान तिकीट बुक करण्यास सांगितले.

सरकारी नोकरांना, बुकिंगच्या वेळी, खाली नमूद केलेल्या स्लॉटमधील नॉन-स्टॉप फ्लाइटसाठी त्यांच्या पात्र प्रवास श्रेणीतील सर्वोत्तम उपलब्ध भाडे असलेली फ्लाइट निवडावी लागेल. जे सर्वात स्वस्त उपलब्ध भाडे आहे. एलटीसी दाव्यांसाठी त्यांना संबंधित एटीएच्या वेबपेडची प्रिंट-आउट ठेवावी लागेल ज्यामध्ये फ्लाइट आणि भाडे तपशील असतील.

एलटीसीचे नवे नियम जारी…

  • केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना प्रवासाच्या नियोजित तारखेच्या किमान २१ दिवस आधी एलटीसीवर फ्लाइट तिकीट बुक करण्यास प्रोत्साहित केले जाते, जेणेकरून चांगला लाभ घेता येईल.
  • विमान प्रवासासाठी पात्र असलेले सरकारी कर्मचारी अधिकृत ट्रॅव्हल एजन्सीच्या संबंधित वेबपेजच्या प्रिंट-आउटसह एलटीसी अॅडव्हान्ससाठी अर्ज करू शकतात. ज्यामध्ये तीन तासांच्या टाइम स्लॉट अंतर्गत फ्लाइटचे भाडे ट्रॅक करताना योग्य फ्लाइट आणि भाडे तपशील आहेत.
  • ज्या सरकारी नोकरांना विमानाने प्रवास करण्याचा अधिकार नाही आणि ज्यांना विमानाने प्रवास करण्याची इच्छा आहे परंतु विशेष सवलत योजनेंतर्गत नाही त्यांनीही वर नमूद केलेल्या तीन एटीएद्वारे त्यांचे विमान तिकीट बुक करणे आवश्यक आहे.
  • तसेच, वास्तविक विमान भाडे किंवा सर्वात लहान मार्गासाठी पात्र ट्रेन/बस भाडे यापैकी जे कमी असेल तितके मर्यादित असेल.

कर्मचार्‍यांना अनावश्यक कॅन्सिलेशन टाळण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. एलटीसीवर प्रवासाच्या २४ तासांच्याही कमी वेळेत कॅन्सिलेशन केल्‍यास, कर्मचार्‍याने स्‍वयं-घोषित औचित्य सादर करणे आवश्‍यक असेल. तिन्ही एटीएला शून्य कॅन्सिलेशन शुल्क प्रदान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कार्यालयाद्वारे ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून तिकिटांची व्यवस्था केली जाऊ शकते, कर्मचार्‍यांना केवळ सेल्फ बुकिंग टूल / ऑनलाइन बुकिंग वेबसाइट / ३ एटीएच्या पोर्टलद्वारे डिजिटल पद्धतीने तिकीट बुकिंग करण्यास प्रोत्साहित केले जाते.

 

पाहा:


Tags: Air Ticket BookingCentral Government Employeescentral govtgood newsLive Travel ConcessionLTC Rulesmuktpeethउपयोगी बातमीएलटीसी नियमकेंद्र सरकारकेंद्रीय सरकारी कर्मचारीचांगली बातमीमुक्तपीठलिव्ह ट्रॅव्हल कन्सेशनविमान तिकीट बुकिंग
Previous Post

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते ‘बीवायपी, व्हीआयपी आणि मी’ पुस्तकाचे दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन!

Next Post

ओएनजीसीत ८७१ पदांवर नोकरीची संधी

Next Post
ongc

ओएनजीसीत ८७१ पदांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!