मुक्तपीठ टीम
एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या मिनरनल्स अँड मेटल्स व्यवसायाला अर्सेलरमित्तल निप्पॉन स्टील इंडियाच्या (एएम/एनएस इंडिया) आर्यन अँड स्टील अँड बेनिफिक्शन या दोन भव्य स्टील कंपन्यांची संयुक्त भागिदारी असलेल्या कंपनीद्वारे गुजरात व ओशामध्ये त्यांचा विस्तार करण्याचे काम मिळाले आहे.
नुकत्याच मिळालेल्या या कंत्राटात पुढीलप्रमाणे विविध पॅकेजेसचा समावेश आहे –
- प्रत्येकी ३.५ एमटीपीए क्षमतेच्या दोन ब्लास्ट फर्नेसेसचे गुजरातमधील हाझिरा प्लँटवर ईपीसी तत्वावर इन्स्टॉलेशन. या कामात इतर गोष्टींबरोबरच पूरक पुरवठा, बांधकाम, टप्प्याटप्प्यात दोन्ही युनिट्सचे – ब्लास्ट फर्नेसेस २ आणि ३ चे इन्स्टॉलेशन.
- त्याच कॉम्प्लेक्समध्ये एम अँड एमद्वारे ६ एमटीपीए क्षमतेच्या स्टील मेल्ट शॉपचे तपशीलवार डिझाइन व संपूर्ण प्लँटसाठीच्या इंजिनियरिंगसह इन्स्टॉलेशन केले जाईल, आवश्यक गोष्टींचा पुरवठा केले जाईल आणि बांधकाम पूर्ण केले जाईल. या कामात प्लँट लेआऊट, स्टील निर्मिती सुविधेची उभारणी, सेकंडरी मेटल्यर्जी आणि स्लॅब कास्टिंग युनिट्स इत्यादी काम निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण केले जाईल.
- ओडिशातील सागासाही येथे ६ एमटीपीए ओर बेनिफिक्शन प्लँटची ईपीसी तत्वावर उभारणी
मिनरल्स अँड मेटल्स (एम अँड एम) व्यवसायाद्वारे जगभरातील खाणकाम, मिनरल्स आणि मेटल्ससाठी ईपीसी सुविधा पुरवल्या जातात. या व्यवसायाद्वारे संपूर्ण अभियांत्रिकी, खरेदी, उत्पादन, पुरवठा, बांधकाम, उभारणी आणि खाणकाम प्रक्रियेपासून तयार धातूपर्यंत संपूर्ण प्रकल्पाची अमलबजावणी. एम अँड एमद्वारे कन्सबहाल आणि कांचीपुरम येथील कारखान्यांसाठी सर्वसमावेशक उत्पादन सुविधा पुरवल्या जातात व त्यामध्ये कस्टमाइज्ड मिनरल क्रशिंग उपकरणे आणि पृष्ठभाग खाणकाम, वाळू उत्पादन कारखाने, मटेरियल हाताळणी, वेगवान रेल्वे उपकरण आणि इतर खास तयार करण्यात येणारी महत्त्वाची उपकरणे, खाणकाम, स्टील, पोर्ट्स फर्टिलायझर्स, सिमेंट आणि रसायन कारखान्यांसाठी गुंतागुंतीच्या जुळणी प्रक्रिया यांचा समावेश असतो.