Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गॅस सिलिंडरचं अनुदान मिळत नाही? एवढंच करा आणि खात्यात मिळवा पैसे…

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
LPG Gas Cylinder

मुक्तपीठ टीम

तुम्ही एलपीजी सिलिंडर वापरत असल्यास आणि अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यात येत नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. फक्त थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे. कारण तुमचे एलपीजी कनेक्शन आधारशी लिंक केलेले नाही असे असू शकते. तुम्ही तुमचा एलपीजी आधार कार्डशी लिंक केला नसेल, तर सरकार एलपीजी सबसिडीचे पैसे तुमच्या बँक खात्यात पाठवणार नाही. यासाठी एलपीजी आधार कार्डशी लिंक करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी नेमकं काय करायचं ते सोप्या शब्दात समजवून घेण्यासाठी मुक्तपीठ डॉटकॉमला भेट द्या.

 

वार्षिक १० लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई असणाऱ्यांना सरकार एलपीजी सिलिंडर बुक करण्यावर सबसिडी देत नाही. जर पती-पत्नी दोघेही काम करत असतील तर, दोघांची कमाई जोडून त्यांची गणना केली जाते. म्हणजेच, जर दोघांची कमाई १० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर एलपीजी सबसिडी घेण्यास पात्र मानले जाणार नाही. एलपीजीची सबसिडी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी असते.

 

अलीकडेच पेट्रोल आणि डिझेलसोबतच एलपीजीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानातही दुप्पटीने वाढ झाली आहे. पूर्वी ३७ रुपये अनुदान होते, ते आता वाढले आहे.

 

एलपीजी आधार कार्डशी लिंक करण्याची प्रक्रिया

  • ही प्रक्रिया फोन किंवा कॉम्प्युटरवर करता येणार.
  • फोनवरून ऑपरेट करत असल्यास, ब्राउझरवर जाऊन www.mylpg.in टाइप करा.
  • गॅस कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा फोटो उजव्या बाजूला दिसेल. तुमच्या सेवा पुरवठादाराच्या गॅस सिलेंडरच्या फोटोवर क्लिक करा.
  • आता एक नवीन विंडो उघडेल, जी सर्व्हिस प्रोव्हायडरची असेल.
  • आता तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला साईन-इन आणि न्यू-यूजरचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • जर तुम्ही तुमचा आयडी आधीच तयार केला असेल तर तुम्ही त्यात लॉग इन करू शकता.
  • जर तुमच्याकडे आयडी नसेल, तर तुम्हाला नवीन युजरवर क्लिक करून वेबसाइटवर लॉग-इन करावे लागेल आणि आवश्यक माहिती द्यावी लागेल.
  • लॉग इन केल्यानंतर उघडणाऱ्या विंडोमध्ये तुम्हाला उजव्या बाजूला View Cylinder Booking History हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • कोणत्या सिलिंडरवर किती सबसिडी देण्यात आली आहे हे येथे कळेल.
  • सबसिडीची किती रक्कम दिली गेली याची माहितीही पाहता येणार आहे.
  • जर गॅस बुक केला असेल आणि सबसिडीची रक्कम मिळाली नसेल, तर फीडबॅक बटणावर क्लिक करावे लागेल. येथे सबसिडीचे पैसे न मिळाल्याबद्दल तक्रार करता येते.
  • याशिवाय, जर खात्याशी एलपीजी आयडी लिंक केलेला नसेल, तर वितरकाला भेट देऊनही हे काम करू शकता.
  • १८००२३३३५५५ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही तुम्ही तक्रार नोंदवू शकता.

पाहा व्हिडीओ:


Tags: Aadhaar cardGas cylindergood newslpg gasLPG Gas Cylindermuktpeethrural areassubsidyअनुदानआधार कार्डएलपीजीएलपीजी गॅस सिलिंडरएलपीजी सबसिडीगॅस सिलिंडरचांगल्या बातम्यामुक्तपीठ
Previous Post

दुर्गप्रेमींचा चांगला उपक्रम, माहुली गडावर स्वछता करून नव्या वर्षाचं स्वागत!

Next Post

इलेक्ट्रिक वाहन त्वरित नोंदणी सूट मर्यादेस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

Next Post
electric vehicle

इलेक्ट्रिक वाहन त्वरित नोंदणी सूट मर्यादेस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!