मुक्तपीठ टीम
तुम्ही एलपीजी सिलिंडर वापरत असल्यास आणि अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यात येत नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. फक्त थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे. कारण तुमचे एलपीजी कनेक्शन आधारशी लिंक केलेले नाही असे असू शकते. तुम्ही तुमचा एलपीजी आधार कार्डशी लिंक केला नसेल, तर सरकार एलपीजी सबसिडीचे पैसे तुमच्या बँक खात्यात पाठवणार नाही. यासाठी एलपीजी आधार कार्डशी लिंक करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी नेमकं काय करायचं ते सोप्या शब्दात समजवून घेण्यासाठी मुक्तपीठ डॉटकॉमला भेट द्या.
वार्षिक १० लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई असणाऱ्यांना सरकार एलपीजी सिलिंडर बुक करण्यावर सबसिडी देत नाही. जर पती-पत्नी दोघेही काम करत असतील तर, दोघांची कमाई जोडून त्यांची गणना केली जाते. म्हणजेच, जर दोघांची कमाई १० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर एलपीजी सबसिडी घेण्यास पात्र मानले जाणार नाही. एलपीजीची सबसिडी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी असते.
अलीकडेच पेट्रोल आणि डिझेलसोबतच एलपीजीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानातही दुप्पटीने वाढ झाली आहे. पूर्वी ३७ रुपये अनुदान होते, ते आता वाढले आहे.
एलपीजी आधार कार्डशी लिंक करण्याची प्रक्रिया
- ही प्रक्रिया फोन किंवा कॉम्प्युटरवर करता येणार.
- फोनवरून ऑपरेट करत असल्यास, ब्राउझरवर जाऊन www.mylpg.in टाइप करा.
- गॅस कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा फोटो उजव्या बाजूला दिसेल. तुमच्या सेवा पुरवठादाराच्या गॅस सिलेंडरच्या फोटोवर क्लिक करा.
- आता एक नवीन विंडो उघडेल, जी सर्व्हिस प्रोव्हायडरची असेल.
- आता तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला साईन-इन आणि न्यू-यूजरचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- जर तुम्ही तुमचा आयडी आधीच तयार केला असेल तर तुम्ही त्यात लॉग इन करू शकता.
- जर तुमच्याकडे आयडी नसेल, तर तुम्हाला नवीन युजरवर क्लिक करून वेबसाइटवर लॉग-इन करावे लागेल आणि आवश्यक माहिती द्यावी लागेल.
- लॉग इन केल्यानंतर उघडणाऱ्या विंडोमध्ये तुम्हाला उजव्या बाजूला View Cylinder Booking History हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- कोणत्या सिलिंडरवर किती सबसिडी देण्यात आली आहे हे येथे कळेल.
- सबसिडीची किती रक्कम दिली गेली याची माहितीही पाहता येणार आहे.
- जर गॅस बुक केला असेल आणि सबसिडीची रक्कम मिळाली नसेल, तर फीडबॅक बटणावर क्लिक करावे लागेल. येथे सबसिडीचे पैसे न मिळाल्याबद्दल तक्रार करता येते.
- याशिवाय, जर खात्याशी एलपीजी आयडी लिंक केलेला नसेल, तर वितरकाला भेट देऊनही हे काम करू शकता.
- १८००२३३३५५५ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही तुम्ही तक्रार नोंदवू शकता.