Tuesday, September 29, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतात ‘हा’ डॉलर का पडतोय? जाणून घ्या एकाच नावाच्या दोघांची वेगळी कहाणी…

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Dollar Company Stock

मुक्तपीठ टीम

डॉलर म्हणजे अमेरिकन चलन. जगाच्या व्यापाराचं माध्यम. डॉलर हा वधारत राहतो आणि आपला रुपया पडतो. यावेळी मात्र बातमी आली ती डॉलरला फटका बसत असल्याची. अर्थात ती आली आहे, शेअर बाजारातून! आणि हा डॉलर अमेरिकन चलन नाही तर भारतीय इनरवेअर ब्रँड आहे!

इनरवेअर बनवणाऱ्या डॉलर इंडस्ट्रीजला सप्टेंबरच्या तिमाहीत मोठा तोटा सहन करावा लागला आहे. या तिमाहीत कंपनीची विक्री घसरली आहे. ही विक्री १२.४८% ने घसरून ३४१.९२ कोटी रूपये झाली आहे. त्याच वेळी, डॉलर इंडस्ट्रीजचा निव्वळ नफा सप्टेंबर २०२१ ला संपलेल्या तिमाहीत ४३.७६ कोटी रुपयांच्या तुलनेत ६०.४९% ने घटून १७.२९ कोटी रुपये झाला आहे.

डॉलर कंपनीच्या स्टॉकची स्थिती

  • डॉलर इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत ६.०८% ने खाली आली.
  • आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी शेअरची किंमत ४५४.३० रुपये होती.
  • त्याच वेळी बाजार भांडवल २ हजार ५७५ कोटी रुपये राहिले.
  • या वर्षी २० जानेवारीला शेअरची किंमत ६६५.७० रुपये होती, तर गेल्या वर्षी २० डिसेंबरला शेअरची किंमत ३९७.३० रुपये होती.

डॉलर इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापनाने भारतीय होजरी क्षेत्रातील सुस्तीला कामगिरीचे श्रेय दिले. कापूस आणि धागा यासारख्या इनपुट साहित्याच्या किंमतीतील चढउताराचा फटका या क्षेत्राला बसत आहे. कापूस आणि धाग्याच्या किंमतीत सातत्याने घसरण झाल्यामुळे या तिमाहीत कंपनीला मोठ्या प्रमाणात इन्व्हेंटरी तोटा सहन करावा लागला. हे तात्पुरते असल्याचे डॉलर इंडस्ट्रीजचे म्हणणे आहे. कंपनीकडे सध्या आठ ब्रँड आउटलेट्स आहेत आणि चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस अशी २० ते २५ स्टोअर्स उघडण्याची त्यांची योजना आहे.


Tags: Dollar Company StockDollar IndustriesInnerwear Company Dollarmuktpeethइनरवेअर कंपनी डॉलरघडलं-बिघडलंडॉलर इंडस्ट्रीजडॉलर कंपनी स्टॉकमुक्तपीठ
Previous Post

एकाच वेळी ५० ग्रुपशी कनेक्ट करणारे ‘व्हॉट्सअॅप’चे जबरदस्त फिचर!

Next Post

न्यायाधीशांनी फेडलं गरीब शेतकऱ्याचं कर्ज

Next Post
Jehanabad

न्यायाधीशांनी फेडलं गरीब शेतकऱ्याचं कर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!