Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अमिताभच्या बंगल्यानं अडवलं रस्ता रुंदीकरण, लोकायुक्तांनी विचारला मुंबई मनपाला जाब!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
lokayukta on amitabh bunglow hurdle in road widening

मुक्तपीठ टीम

बिग बी अमिताभ बच्चन यांची मुंबईतील प्रतिक्षा बंगल्याची भिंत चर्चेत आहे. रस्ते रुंदीकरणामध्ये प्रतिक्षा बंगल्याची भिंत अडचण ठरतेय. मुंबई मनपाने रस्ते रुंदीकरणासाठी नेमकी कोणती पावले उचलली याचा चार आठवड्यांमध्ये अहवाल सादर करावा असा आदेश लोकायुक्तांनी दिला आहे. रस्ते रुंदीकरणासाठी अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्याच्या भिंतीचा काही भाग तोडणे हा गरजेचा असल्याचा अहवाला सिटी सर्वे अधिकाऱ्यांनी जुलैमध्येच दिला होता.

 

मुंबई मनपाला लोकायुक्तांचे आदेश

  • अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची भिंत रस्ते रुंदीकरणासाठी अडसर ठरत आहे, रस्ते रुंदीकरणासाठी २०१९ मध्ये मनपाने प्रतिक्षा बंगल्याला लागून असलेल्या इमारतीची भिंत पाडली होती.
  • पण अमिताभ यांच्या बंगल्यावर अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही, याबाबत काँग्रेसनं लोकायुक्तांकडे धाव घेत तक्रार केली होती.
  • मुंबई मनपानं रस्ते रुंदीकरणासाठी कोणती पावलं उचलली, याचा चार आठवड्यात अहवाल सादर करावा, असे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत.

 

नेमकं प्रकरण काय?

  • नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांच्या अर्जावर लोकायुक्तांची सुनावणी पार पडली.
  • मुंबईनं अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्याच्या भिंतीसंदर्भात काय अॅक्शन घेतलीय याची माहिती लोकायुक्तांनी मागवली आहे.
  • २०१७ पासून अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याला नोटीस देण्यात आली आहे.
  • रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये प्रतिक्षा बंगल्याची भिंत येत असल्यानं, ही भिंत हटवण्याबाबतची ही नोटीस आहे.
  • मात्र, २०१७ पासून प्रतिक्षा बंगल्यासंदर्भात मनपानं कोणतीही कारवाई केली नाही.
  • मनपानं दिलेल्या नोटीसनुसार, कारवाई करत नाही, याबाबत नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी लोकायुर्कांकडे अर्ज केला होता.

 

का तोडायची आहे अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्याची भिंत?

  • मुंबईतील जुहू इथल्या संत ज्ञानेश्वर मार्ग रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिकाने आजू बाजूच्या सर्व इमारती आणि बंगल्यांच्या मालकांना त्यांच्या भूखंडाचा काही भाग देण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती.
  • बहुतांश भूखंड मालकांनी प्रतिसाद दिला.
  • मात्र अमिताभ बच्चन यांनी यावर कोणतही उत्तर मुंबई मनपाला दिले नाही.
  • दरम्यान २०१९ मध्ये मनपाने प्रतिक्षा बंगल्याला लागून असलेल्या इमारतीची भिंत पाडली गेली.
  • पण अमिताभ यांच्या बंगल्यावर अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही.
  • प्रतिक्षा बंगल्याच्या बाजूला असलेल्या इमारतींवर रस्ता रुंदीकरणाच्या नावाने मुंबई मनपाने भिंती तोडण्याची कारवाई केली होती.
  • मात्र त्यानंतर त्या इमारतींमधील लोकांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती.
  • त्यांनी म्हटलं होतं की, आमच्या इमारती बाहेर असलेल्या भिंतीवर तोडक कारवाई झाली.
  • मात्र शेजारच्या अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यांच्या भिंतींवर कोणतीही कारवाई नाही झाली.

Tags: Amitabh BachchanBMCPratiksha Banglowअमिताभ बच्चनप्रतिक्षा बंगलामुंबई मनपासिटी सर्वे अधिकारी
Previous Post

जलसंवर्धन योजनेतून ७ हजारांहून अधिक प्रकल्पांची दुरुस्ती

Next Post

परदेशवारी करून आलेल्यांनी तात्काळ माहिती प्रशासनाला द्यावी – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

Next Post
citizens

परदेशवारी करून आलेल्यांनी तात्काळ माहिती प्रशासनाला द्यावी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!