Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

परदेशवारी करून आलेल्यांनी तात्काळ माहिती प्रशासनाला द्यावी – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

November 30, 2021
in घडलं-बिघडलं
0
citizens

मुक्तपीठ टीम

कोरोना विषाणूच्या ओमीक्रॉन व्हेरियंटच्या नव्या प्रकारामुळे संसर्गाचा धोका वाढणार असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. त्यासाठी परदेशवारी करून आलेल्या प्रवाशांची तपासणी करणे, त्यांच्याकडे बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तरी पदरेशवारी करून आलेल्यांनी प्रशासनाला त्वरीत माहिती द्यावी. याबरोबरच आपल्या शेजारील, आपल्या भागातील, आपल्या गावातील, आपल्या संबंधातील कोणी व्यक्ती परदेशवारी करून आल्यास नागरिकानींही याबाबतची माहिती आरोग्य यंत्रणेला द्यावी. कोरोनाशी अव्याहतपणे सुरू असलेल्या लढाईत चांगल्या प्रकारचा मास्क योग्य पध्दतीने नियमीत व सातत्याने वापरणे आवश्यक आहे. कोविड प्रतिबंधासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य असून ज्यांनी अद्यापही पहिला डोस घेतला नाही अशा 18 वर्षे पूर्ण झालेल्यांनी त्वरीत पहिला डोस घ्यावा. तसेच ज्यांनी पहिला डोस घेतला आहे अशांनी दुसरा डोस विहीत कालावधीत घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

 

  • कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे आवाहन
  • कोविडला दूर ठेवण्यासाठी कोविड योग्य वर्तन ठेवा
  • लसीकरण, मास्कचा प्रभावी वापर, सोशल डिस्टन्सींग ‍त्रिसुत्रीचे काटेकोर पालन आवश्यक

आत्तापर्यंत आलेल्या कोरोना विषाणूच्या व्हेरियंटच्या तुलनेत सध्याचा ओमीक्रॉन व्हेरियंट अधिक घातक असून संसर्गही अधिक गतीने पसरवणारा आहे , असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, गतवेळच्या कोरोनाच्या दोन्ही लाटांचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. हा अनुभव लक्षात घेता संभाव्य परिस्थितीसाठी आरोग्य यंत्रणेने सर्वोतोपरी सज्जता ठेवावी. ऑक्सिजनचा पुरेसा साठा, औषधांची उपलब्धता, अग्नीसुरक्षा यंत्रणा या सर्व दृष्टीने आवश्यक ती सर्व तयारी यंत्रणांनी करावी. कोविडला दूर ठेवण्यासाठी कोविड योग्य वर्तन, मास्कचा प्रभावी वापर, सोशल डिस्टंन्सींग, अनावश्याक गर्दी टाळणे या सर्व बाबींचे काटेकोर पालन होणे आवश्यरक आहे. कोविड रूग्णांचे प्रमाण काहीसे कमी झाल्याअमुळे लोकांमध्ये बेसावधपणा व बेफिकीरी वाढली आहे. पण उपचारापेक्षा प्रतिबंध केंव्हाही चांगला हे तत्व अनुसरून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी.

 

यावेळी नागरिकांना आवाहन करताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सद्याचा कोरोना ओमीक्रॉन व्हेररियंटची घातकता लक्षात घेता दुहेरी मास्कत घालणे, सर्जिकल तीन प्लाय मास्क , एन-९५ प्रकारातील मास्क घालणे आवश्यक आहे. अनावश्याक गर्दी टाळा, आवश्यक असेल तरच प्रवास करा आणि लसींचे दोन्ही डोस विहीत वेळेत घ्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी अत्यंत काटेकोरपणे काळजी घ्यावी. तसेच कोरेोना सदृष्य लक्षणे असणाऱ्या प्रत्येक रूग्णांची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. विशेषत: जर एखाद्याने हवाई प्रवास केला असल्यास आरटीपीसीआर चाचणी प्राधान्याने करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.


Tags: coronaDr. Abhijeet ChaudharyOmicron variantओमीक्रॉनकोरोनाडॉ. अभिजीत चौधरी
Previous Post

अमिताभच्या बंगल्यानं अडवलं रस्ता रुंदीकरण, लोकायुक्तांनी विचारला मुंबई मनपाला जाब!

Next Post

एचआयव्ही बाधितांच्या उपचारासाठी डायलेसिस मशिन व कार्यालयासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

Next Post
Dailysis machine

एचआयव्ही बाधितांच्या उपचारासाठी डायलेसिस मशिन व कार्यालयासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!