मुक्तपीठ टीम
देशाचे पहिले सीडीएस अधिकारी बिपिन रावत यांच्यासह १३ जणांचा बुधवारी तामिळनाडूमधील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. जनरल रावत यांच्यासह Mi-17V5 हेलिकॉप्टरमध्ये ब्रिगेडियर दर्जाचे अधिकाऱ्यांसह त्यांचे सहाय्यक होते. या दुर्घटनेतून फक्त ग्रुप कॅप्टन वरुण सिंग बचावले आहेत. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
General MM Naravane #COAS & All Ranks of #IndianArmy pay heartfelt condolences on the untimely demise of General Bipin Rawat #CDS, Mrs Madhulika Rawat & 11 other passengers on board, in an unfortunate air crash at #Coonoor. (1/n) pic.twitter.com/sc6bmFodXJ
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) December 8, 2021
हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचे आदेश
दुपारी दोनच्या सुमारास कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर कोसळले. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे हवाई दलाने सांगितले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल रावत सशस्त्र दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि त्यांची लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी तीन सेवांच्या महत्त्वाकांक्षी आधुनिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख करत होते.
The dynamic and inspiring leadership of General Bipin Rawat shall remain eternally etched in our memories. The #IndianArmedForces will forever remain indebted to his invaluable contributions. (2/n) pic.twitter.com/0V2kcMtNUX
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) December 8, 2021
तिन्ही सैन्य दलांकडून शोक व्यक्त
- जनरल रावत १७ डिसेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत भारतीय लष्कराचे प्रमुख होते.
- ३१ डिसेंबर २०१९ रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
- जनरल रावत, त्यांच्या पत्नी आणि अन्य ११ जणांच्या निधनाबद्दल लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला.
- लष्कराने ट्विट केले की, “जनरल बिपिन रावत यांचे दिग्गज आणि प्रेरणादायी नेतृत्व नेहमी आमच्या आठवणींमध्ये राहील.
त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल भारतीय लष्कर सदैव ऋणी राहील. - ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर उपचार सुरु
या अपघातातून फक्त ग्रुप कॅप्टन वरुण सिंग बचावले आहेत. त्यांच्यावर वेलिंग्टन येथील आर्मी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
मृत्यू पावलेल्या अधिकाऱ्यांची नावं
- सीडीएस बिपिन रावत
- मधुलिका रावत
- ब्रिगेडियर एलएस लिडर
- लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग
- विंग कमांडर पीएस चौहान
- स्क्वाड्रन लीडर के. सिंग
- जेडब्ल्यूओ. दास
- जेडब्ल्यूओ प्रदीप ए
- नाईक गुरसेवक सिंग
- नाईक जितेंद्र कुमार
- लान्स नाईक विवेक कुमार
- लान्स नाईक साई तेजा
- हवालदार सतपाल
#IndianArmy also conveys heartfelt condolences & stands firm in support of the bereaved families of the following personnel.
Brig LS Lidder
Lt Col H Singh
Wg Cdr PS Chauhan
Sqn Ldr K Singh
JWO Das
JWO Pradeep A
Hav Satpal
Nk Gursewak Singh
Nk Jitender
L/Nk Vivek
L/Nk S Teja (3/n) pic.twitter.com/7Ij7YBYi2J— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) December 8, 2021
हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, Mi-17V5 हेलिकॉप्टरमध्ये CDS आणि इतर नऊ प्रवासी आणि चार क्रू सदस्य होते.