Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नौदल सोहळ्यात ‘सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ता हमारा’ गुंजले…उपस्थित हेलावले!

२२ व्या ‘व्हेसल स्क्वॉड्रन्स’ युद्धनौकेच्या तुकडीसाठी विविध धर्मगुरुंकडून विशेष प्रार्थना

December 9, 2021
in घडलं-बिघडलं
0
PRESIDENT’S STANDARD AWARDED TO 22ND MISSILE VESSEL SQUADRON

मुक्तपीठ टीम

नौदलातील लेफ्टनंट युद्धी सुहाग यांना यावेळी ‘निशाण अधिकारी’ होण्याचा मान मिळाला. ‘किलर्स’ तुकडीने ५० वर्षे देशाची, नौदलाची सेवा केल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना ‘प्रेसिडेंंट फ्लॅग’ सुपूर्द केला. या कार्यक्रमात नौदल बँडचे प्रमुख मास्टर चिफ पेटी आॅफिसर (एमसीपीओ) अँॅथनी राज हे नौदलातील बँडवादक सैनिकांचे प्रमुख अधिकारी आहेत. त्यांच्या सुचनांनुसार बँडवादकांनी राष्ट्रगीताची धुन तसेच राष्ट्रपतींच्या आगमनावेळी वाजवला जाणारे सुमधूर बँडवादन, अंतिमवेळी सारे जहाँ से अच्छा’ या गाण्याची धून वाजवली. जी सर्वांच्या मनाला भिडली. हेलावून गेली.

PRESIDENT’S STANDARD AWARDED TO 22ND MISSILE VESSEL SQUADRON

 

  • नौदलातील ३३ सैनिकांनी यावेळी कंटिंजन्सी ड्रिलच्या अत्यंत शानदार कवायती दाखवल्या आणि सर्व उपस्थितांची वाहवा मिळवली. यावेळी ‘स्वर्णिम’ म्हणजेच ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सैनिकांनी ५० हा आकडा मानवी आकृतीतून सादर केला. त्यांच्या या कल्पनेला उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली.
  • नौदलाच्या ताफ्यातील चेतक, रशियन बनावटीच्या कमॉव्ह, एएलएच ध्रुव आणि सी किंग या हेलिकॉप्टर्सनी विविध कठीण कवायती सादर करुन, उपस्थितांना चकीत केले. नौदलातील कमांडो अशी ओळख असलेल्या ‘मार्कोस’नी खोल समुद्रात सापडलेल्या , बुडणा-यांचे जीव वाचवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.

PRESIDENT’S STANDARD AWARDED TO 22ND MISSILE VESSEL SQUADRON

२२ व्या ‘व्हेसल स्क्वॉड्रन्स’युद्धनौकेच्या तुकडीसाठी विविध धर्मगुरुंकडून विशेष प्रार्थना

PRESIDENT’S STANDARD AWARDED TO 22ND MISSILE VESSEL SQUADRON

भारतीय नौदलाच्या ताफ्यात असलेल्या २२ व्या ‘व्हेसल स्क्वॉड्रन्स’ युद्धनौकेच्या तुकडीसाठी ब्राह्मण, मौलवी, शिख आणि फादर या विविध धर्मगुरुंकडून विशेष प्रार्थना करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाचे वरिष्ठ अधिकारी व अन्य अधिकारी, त्यांचे कुटुंबियांच्या समोर ही प्रार्थना झाली. महत्वाचे म्हणजे असे की, हे चौघेही धर्मगुरु नौदलाच्या सेवेत आहेत. अशा महत्वाच्या प्रसंगांवेळी हे धर्मगुरु आपापल्या भाषेत विविध प्रार्थना करुन, सदा सर्वदा आशिर्वाद शुभेच्छा देतात. बुधवारी हा नौदल समारंभ सुरु होण्याच्या ब-याचआधी हे धर्मगुरु स्थापनापन्न झाले होते. राष्ट्रपतींच्या आगमनानंतर काहीवेळाने ब्राह्मण गुरुजींनी संस्कृत स्तोत्रांचे वाचन करुन सदा सर्वदा आशिर्वाद आणि ओम शांती शांती अशा शुभेच्छा दिल्या. तर मौलवींनी बिस्मिल्ला केला तर शिख गुरुंनी गुरु नानक यांची धार्मिक वचने वाचली तर फादरनीही इंग्रजीत प्रार्थना करुन नौसेना अधिकारी आणि सैनिकांना सुयश चिंतीले.


Tags: २२ व्या ‘व्हेसल स्क्वॉड्रन्स22nd Vessel SquadronIndian Navyभारतीय नौदलसारे जहाँसे अच्छाहिंदोस्ता हमारा
Previous Post

हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपिन रावत यांच्यासह आणखी कोणत्या अधिकाऱ्यांनी अखेरचा श्वास घेतला? वाचा संपूर्ण यादी…

Next Post

शरद पवारांना खुर्ची दिल्यामुळे संजय राऊत लक्ष्य! संतापलेल्या राऊतांचं प्रत्युत्तर!

Next Post
raut gave chair to pawar

शरद पवारांना खुर्ची दिल्यामुळे संजय राऊत लक्ष्य! संतापलेल्या राऊतांचं प्रत्युत्तर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!