Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी महाराष्ट्रात प्रयत्न केले जाणार

मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या सूचना, व्हीसीव्दारे घेतला आढावा

December 9, 2021
in घडलं-बिघडलं
0
कोविड परिस्थितीबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा 1

मुक्तपीठ टीम

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण त्याचबरोबर चाचणी करण्याचे प्रमाणही वाढवा, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी दिल्या. लशीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोसही वेळेत दिला जाईल याकडे लक्ष द्यावे, असेही देबाशिष चक्रवर्ती यांनी सांगितले.

            

मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधून कोविड परिस्थितीबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा घेतला.

            

बैठकीच्या सुरवातीला आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटबाबत सविस्तर माहिती दिली. सध्या हाय रिस्क देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात येत आहे. त्यापैकी ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे, अशा प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतरही संबंधित रुग्णांवर लक्ष ठेवण्यात यावे. तसेच काँटैक्ट ट्रेसिंग अतिशय बारकाईने करावे. चाचणीसाठी आवश्यक असणारी टेस्टिंग किट्स एनएचएमच्या निधीतून खरेदी करावी, असे सांगितले.

            

मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना तत्काळ मदत मिळेल यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. कोरोनाने निधन झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांशी संपर्क साधावा. याबाबत प्रसिद्धी करावी. पोर्टल वर आलेल्या अर्जांची छाननी करण्याची कार्यवाही गतीने करावी, अशा सूचना दिल्या.

            

वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती करण्याचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. मिशन ऑक्सिजननुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प पूर्ण करुन घ्यावेत. यासाठी आवश्यक असणारी कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

            

यावेळी मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. अनबलगन, आरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामी, स्टेट मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, सिडकोचे सह कार्यकारी संचालक अश्विन मुदगल, परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंह, कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, महात्मा फुले आरोग्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.


Tags: Debashish ChakrabortyMaharashtraदेबाशिष चक्रवर्तीमहाराष्ट्र
Previous Post

भारतीय सागरी क्षेत्रात शांततेसाठी भारतीय नौदल सुरक्षाविषयक भागीदार – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

Next Post

हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपिन रावत यांच्यासह आणखी कोणत्या अधिकाऱ्यांनी अखेरचा श्वास घेतला? वाचा संपूर्ण यादी…

Next Post
list of officers in helicopter crash in coonoor 9-12-21

हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपिन रावत यांच्यासह आणखी कोणत्या अधिकाऱ्यांनी अखेरचा श्वास घेतला? वाचा संपूर्ण यादी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!