मुक्तपीठ टीम
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (एसजीएनपी) यशस्वीरित्या बिबट्यांना रेडिओ कॉलर लावण्यास वेग आला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि जीवशास्त्रज्ञांनी सावित्री नावाच्या मादी बिबट्याला रेडिओ कॉलर लावण्यात आली.
संजय गांधी नॅशनल पार्कचे संचालक आणि मुख्य वनसंरक्षक जी मल्लिकार्जुन यांनी या मोहिमेमुळे बिबट्यांचे संरक्षण होणार असल्याची माहिती दिली.
बिबट्यांना रेडिओ कॉलरची मोहीम
• पहिल्या टप्प्याच्या सुरूवातीला रेडिओ कॉलर करून एक बिबट्या सोडला.
• त्याचे वय अंदाजे सहा वर्षे आहे आणि आमच्या स्थानिक कर्मचार्यांनी त्याचे नाव महाराज ठेवले आहे.
• दोन वर्षांच्या कालावधीत पाच बिबट्यांना रेडिओ कॉलर किंवा जीपीएस कॉलर लावण्यात आले आहेत. त्यात तीन मादी आणि दोन नर आहेत.
• पहिल्या टप्प्यात निवडलेले पाच बिबटे संजय गांधी नॅशनल पार्क आणि परिघातील वेगवेगळ्या ठिकाणी आहेत.
• आता तीन मोठ्या बिबट्यांना रेडिओ कॉलर लावल्या आहेत.
वाइल्डलाइफ वेस्टचे अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिलेल्या माहितीनुसार,
रेडिओ कॉलरमुळे बिबट्यांचा अभ्यास
• संजय गांधी नॅशनल पार्क हे बिबट्यांचे जगातील सर्वाधिक घनतेचे क्षेत्र आहे.
• येथे केलेला बिबट्याचा अभ्यास बिबटे आणि माणूस यांच्या परस्पर संवादाविषयी माहिती देईल.
• त्यांच्या हालचालींचे विशिष्ट नमुनेही समजून घेता येईल.
• बिबट्यांच्या सक्रियतेचा कालावधी, विश्रांतीचा कालावधी कळेल.
• संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आणि रस्ते ओलांडण्यासाठी ते वापरतात ती ठिकाणे लक्षात येतील.
• त्यामुळे स्थानिक बिबट्यांसाठी अधिक चांगले संरक्षण धोरण आखण्यात मदत होईल.
कित्येक वर्षांमध्ये अनेक मूलभूत पायाभूत प्रकल्प हाती आले आहेत आणि कोणताही उपाय न करता जंगलाजवळील महामार्ग आणि रस्ते वन्य प्राण्यांसाठी जीवघेणे ठरले आहेत. या अभ्यासामुळे ते कमी करण्यासाठी उपाय तयार करण्यात मदत होईल.
पाहा व्हिडीओ: