Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘कुळवाडी भूषण शिवराय’ विषयावर साहित्यिक श्रीकांत देशमुख यांचे व्याख्यान

April 1, 2021
in सरकारी बातम्या
0
shrikant deshmukh

मुक्तपीठ टीम

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ३ एप्रिल २०२१ रोजी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक श्रीकांत देशमुख यांचे ‘कुळवाडी भूषण शिवराय’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.

महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने १९ मार्च २०२१ पासून ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु आहे. शनिवार ३ एप्रिल रोजी श्रीकांत देशमुख हे दुपारी ४.०० वाजता व्याख्यान मालेचे १६ वे पुष्प गुंफणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित या विशेष व्याख्यानातून शिवरायांच्या वैविद्यपूर्ण व्यक्तीमत्वाचे पैलु उलगडणार आहेत.सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

श्रीकांत देशमुख यांच्या विषयी

श्रीकांत देशमुख हे महाराष्ट्र शासनात उच्चश्रेणी अधिकारी असून एक उत्तम साहित्यिक आहेत. शासनसेवेसोबतच त्यांनी लेखन व संशोधनाचे कार्य सुरु ठेवले आहे. ‘बळीवंत’,‘आषाढमाती’ आणि

‘बोलावे ते आम्ही’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशितआहेत. ‘बोलावे ते आम्ही’ या कविता संग्रहास २०१७ मध्ये साहित्यक्षेत्रातील मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे.

‘पडझड वा-याच्या भिंती’, ‘साखर कारखानदारीतले दादा’ ही त्यांची ललित गद्यअंगाची पुस्तके प्रसिध्द आहेत. ‘महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ’ आणि ‘कुळवाडी भूषण शिवराय’ ही त्यांची वैचारीक पुस्तके प्रकाशित आहेत. ‘पिढीजात’ ही त्यांची कांदबरी आणि ‘नली’ हे नाटकही प्रसिध्द आहे. ‘महानोरांची कविता’, ‘समकालीन साहित्य विचार, ‘डॉ. नागनाथ कोत्तापल्ले गौरवग्रंथ’ आणि ‘भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य : नव्या पिढीचे अर्धशतकोत्तर पुनरावलोकन’ या पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे.

श्रीकांत देशमुख यांच्या साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी केंद्र शासनाचा साहित्य अकादमी पुरस्कार, राज्य शासनाचा केशवसूत पुरस्कार,अमेरिकेच्या महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुस्कार आदींनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

शनिवारी समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण

शनिवार, ३ एप्रिल २०२१ रोजी दुपारी ४ वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

हे व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI, फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhiयुटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.


Tags: LectureShrikant Deshmukhछत्रपती शिवाजी महाराजमहाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालाश्रीकांत देशमुख
Previous Post

फेसबूकला चकवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प याचं ‘अग बाई सुनबाई…’

Next Post

राज्यात ४३ हजार नवे रुग्ण, मुंबई ८ हजार ६४६, ४८ तासात १४० मृत्यू

Next Post
राज्यात ४३ हजार नवे रुग्ण, मुंबई ८ हजार ६४६, ४८ तासात १४० मृत्यू

राज्यात ४३ हजार नवे रुग्ण, मुंबई ८ हजार ६४६, ४८ तासात १४० मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!