मुक्तपीठ टीम
प्रसिध्द लेखिका तथा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ. विजया वाड या महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत’ २३ मार्च २०२१ रोजी ‘ध्यानी मनी विश्वकोश’ या विषयावर पाचवे पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’आयोजित करण्यात आली आहे. २३ मार्च रोजी व्याख्यानमालेच्या पाचव्या दिवशी डॉ. विजया वाड या दुपारी ४ वाजता आपले विचार मांडणार आहेत.
डॉ. विजया वाड यांच्याविषयी
- डॉ. विजया वाड यांची एकूण १५२ पुस्तके प्रकाशित असून त्यात २५ कादंबऱ्या, ४० कथासंग्रह, ५ चरित्रे (इतरांची), ८० बाल पुस्तके व २ नाटकांचा समावेश आहे.
- ‘बंडू बॉक्सर’, ‘टिंकू टिंकल’ या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाले आहेत.
- २००५ ते २०१५ या प्रदीर्घ कालावधीत महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष मंडळाच्या अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
- या दरम्यान त्यांनी एकूण ७ विश्वकोष खंडांचे प्रमुख संपादक म्हणून जबाबदारी पार पाडली.
- त्यांच्याच कार्यकाळात मराठी विश्वकोषाचे संकेतस्थळ तयार होवून २६००० पृष्ठांचे २० खंड डिजीटल स्वरूपात वाचकांसाठी उपलब्ध झाले.
- या संकेतस्थळास महाराष्ट्र राज्याचा ‘प्लॅटिनम’ पुरस्कार तर कॉम्प्युटर सोसायटीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
- मराठी विश्वकोश सर्वांपर्यंत पोहोचावा याकरिता त्यांनी महाराष्ट्रभर ग्रंथवाचन स्पर्धा घेतल्या, याची नोंद घेत कोलंबो विद्यापीठाने त्यांना डी.लीट. हा बहुमान दिला.
मंगळवारी समाजमाध्यमांहून व्याख्यान प्रसारण
मंगळवार २३ मार्च २०२१ रोजी दुपारी ४ वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI, फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi युटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.