मुक्तपीठ टीम
‘महाराष्ट्र CET लॅा-२०२१’साठी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. पाच वर्षांच्या लॉ प्रोग्राम सामायिक प्रवेश परीक्षेसाठी म्हणजेच MHT CET २०२२साठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर ही नोंदणी सुरू झाली आहे.
हे लक्षात ठेवा…
- अर्ज करण्यासाठी, विद्यार्थ्यांना पोर्टलला भेट देऊन नोंदणी करावी लागेल.
- उमेदवारांनी नोंद घ्यावी की अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ एप्रिल २०२२ आहे.
- शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
याशिवाय, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी खाली सोपे मार्ग दिले आहेत, ज्याचे अनुसरण करून विद्यार्थ्यी फॉर्म भरू शकतात.
नक्की लक्षात ठेवा या तारखा…
- महाराष्ट्र CET लॉ साठी नोंदणी प्रक्रिया मार्च १९, २०२२ पासून सुरू
- महाराष्ट्र CET लॉ ची नोंदणी प्रक्रिया ७ एप्रिल २०२२ला संपेल
- महाराष्ट्र CET लॉ हॉल तिकीट – ३० एप्रिलला मिळेल
- महाराष्ट्र CET लॉ परीक्षा – १७, १९ मे, २०२२ आयोजीत केली जाणार आहे.
- महाराष्ट्र CET लॉ चा निकालाची तारखा जाहीर केली नाही.
MAH LLB CET २०२२: महाराष्ट्र CET लॅा २०२१ साठी नोंदणी कशी करावी?
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या – mahacet.org.
- त्यानंतर “MAH-LLB (5 वर्षे) CET-2022 (Integrated Course)” या लिंकवर क्लिक करा.
- आता “नवीन नोंदणी” लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर तपशील भरून आपली नोंदणी करा.
- अर्ज फी भरा आणि पुढे जा.
- फॉर्म सेव्ह करा आणि सबमिट करा.
- प्रिंट आउट घ्यायला विसरू नका.
MAH LLB CET २०२२ अर्ज करण्यासाठी कोण पात्र?
- उमेदवारांनी महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्थेतून SSC आणि HSC परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा भारतातील किंवा बाहेरील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
ही लिंक क्लिक करा, अधिकृत माहिती मिळवा
https://view.mahacet.org/mahacet/admin/news_document/IB5yrsCET17032022.pdf