Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘काश्मिर फाइल्स’च्या नावावर ई-भामटेही सक्रिय! ‘ही’ लिंक तर करु नका क्लिक!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Kashmir files

मुक्तपीठ टीम

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. काहींनी त्याला डोक्यावर उचलून घेतला तर काही त्यावर दणकून टीका करत आहेत. मात्र, बॉक्सऑफिसवर हा चित्रपट चांगलं यश मिळवत आहे. वादामुळे तो पाहण्याकडे प्रेक्षकांचा आणि भाजपा नेत्यांच्या पुढाकारानं आयोजित शोमुळे गर्दी वाढतानाच दिसत आहे. एकीकडे १०० कोटींचा गल्ला जमवणारं यश तर दुसरीकडे चित्रपट चर्चेत असण्याचा गैरफायदा घेण्यासाठी काही ई-भामटे सरसावल्याचं दिसत आहे. ते फुकटात चित्रपट डाऊनलोड करण्याचं आमिष दाखवणारी लिंक पाठवत आहे. ती लिंक क्लिक केली तर त्या अकाऊंटमधील पैशावर डल्ला मारला जात असल्यानं पोलिसांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.

 

प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत असणारा काश्मिर फाइल्स चित्रपटाच्या नावाचा गैरवापर करून स्मार्टफोन यूजर्सची फसवणूक करण्याचा मार्गही सायबर गुन्हेगारांनी शोधला आहे. सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या अशा लिंक्सबाबत पोलिसांनी धोक्याची सूचना दिली आहे, जे काश्मीर फाइल्स चित्रपटाचा मोफत एक्सेस देण्याचा दावा करत आहेत.

 

कसा चालतो मोफत चित्रपट डाउनलोड घोटाळा?

  • ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला चांगलीच प्रसिद्धीही मिळाली आहे.
  • याचा फायदा घेत सायबर गुन्हेगार मोफत चित्रपट डाउनलोड करण्याच्या बहाण्याने व्हॉट्सअॅपवर लिंक पाठवत आहेत. आजवर जेही लोकप्रिय होतं, त्याचा गैरफायदा ई-भामटे असाच घेत असतात.
  • या लिंकवर क्लिक करताच, गुन्हेगारांना फोनवरील वैयक्तिक तपशीलात प्रवेश मिळतो आणि ते बँक खात्यांसारखी गुप्त माहिती सहजपणे चोरू शकतात.

 

काश्मीर फाइल्स व्हॉट्सअॅप फसवणूक कशी होते?

  • सायबर गुन्हेगार व्हॉट्सअॅप यूजर्सच्या खात्यावर लिंक पाठवतात. या लिंकसह एक मेसेज असतो जो यूजर्स लिंकवर क्लिक करून ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट मोफत डाउनलोड करू शकतात.
  • या लिंकवर क्लिक करताच फोनमध्ये मालवेअर घुसतो.
  • हा मालवेअर फोन हॅक करून बँकिंग तपशील चोरतो, जेणेकरून गुन्हेगार आर्थिक व्यवहार करू शकतात.
  • पोलिसांनी धोक्याचा इशारा दिला आहे आणि अज्ञात स्त्रोताकडून व्हॉट्सअॅप किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सापडलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करु नका, असे आवाहन केले आहे.
  • पोलिसांनी म्हटले आहे की, हे देखील शक्य आहे की यूजर्सचे फोन हॅक केले जाण्याची शक्यता आहे आणि त्यांना त्याबद्दल माहिती देखील नाही आणि खात्यातून पैसे गायब झाल्यावरच हॅकची माहिती मिळेल.
  • नोएडा एडीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, २४ तासांत तीन जण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि एकूण ३० लाख रुपयांच्या सायबर फ्रॉडची तक्रार दाखल केली.

Tags: cyber crimeFree movie download scamKashmir FilesMalwarephone hackWhatsApp Fraudकाश्मीर फाइल्सफोन हॅकमालवेअरमोफत चित्रपट डाउनलोड घोटाळाव्हॉट्सअॅप फसवणूकसायबर गुन्हे
Previous Post

आयफोन यूजर्ससाठी मोठा अलर्ट! आयफोनमध्ये iOS 15.4 अपडेट करण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा!

Next Post

वकिलीत करिअर करायचंय? ‘महाराष्ट्र CET लॅा-२०२१’ नोंदणी करा! जाणून घ्या कसा करायचा अर्ज…

Next Post
learn how to apply for Maharashtra CET LAW-2021 Entrance exam

वकिलीत करिअर करायचंय? 'महाराष्ट्र CET लॅा-२०२१' नोंदणी करा! जाणून घ्या कसा करायचा अर्ज...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!