Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

न्यायालयीन निर्णयाची आठवण देत नेत्यांनी मैदान सोडले, वकील सदावर्ते नेतेगिरीसाठी न्यायालयातून मैदानात सरसावले!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
leaders left agitation, lawyer trying to get leadership

मुक्तपीठ टीम

राज्य सरकारने एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी वेतनवाढीची घोषणा केली. यानंतर राज्य सरकारच्या घोषणेचे स्वागत करत एसटी कर्मचाऱ्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनाचे नेतृत्व करत असलेले भाजपाचे आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनातून काढता पाय घेत असल्याची घोषणा केली. पहिला टप्पा जिंकला आहे. न्यायालयीन निर्णयानंतर दुसऱ्या टप्प्याचं आंदोलन असेल तर सोबत असू, असे सांगत त्या नेत्यांनी मैदान सोडले. पण त्याचवेळी न्यायालयीन प्रकरणात बाजू मांडत असलेले अॅड गुणरत्न सदावर्ते मात्र न्यायालयाबाहेर नेतेगिरीच्या आवेशात मैदानात आले आहेत. नेत्यांवर टीका करत विलीनीकरणासाठी आंदोलन डंके की चोट पे असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

 

खोत आणि पडळकरांना आंदोलनातून आझाद केले

  • या आंदोलनाचे सुरुवातीपासून नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी या आंदोलनातून बाहेर पडत असल्याचे सांगितले.
  • त्यानंतर तात्काळ या आंदोलनाचे नेतृत्व आता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या ताब्यात घेतल्याचे दिसले.
  • सदावर्ते यांनी गुरुवारी एक पत्रकार परिषद घेतली. खोत आणि पडळकरांनी पोलिसांच्या गराड्यात पत्रकार परिषद घेतली.
  • तेव्हा तुम्ही काय ते समजून घ्या.
  • त्यांना सरकारने आपल्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले.
  • या खोत आणि पडळकरांना आम्ही आंदोलनातून आझाद केले आहे.

 

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा इशारा

  • सदावर्ते म्हणाले की, एस. टी. कामगारांची ही लोकचळवळ आहे.
  • हा खोत-पडळकर यांनी एकट्यांनी पुकारलेला लढा नाही.
  • कामगार नेते दत्ता सामंत यांच्या हत्येनंतर ७० वर्षांनी ही अभूतपूर्व लोकचळवळ सुरू आहे.
  • सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी स्वतःसाठी या आंदोलनाला स्थगिती दिली.
  • आम्ही विलीनीकरणासाठी डंके की चोट पे, हे आंदोलन सुरूच ठेवू.

 

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या या इन्स्टिट्यूशनल मर्डर

  • आजापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या या इन्स्टिट्यूशनल मर्डर आहेत.
  • आमचे मित्र संजय राऊत लेखनी चालवतात.
  • त्यांनी एकदा तरी आपल्या रोखठोकमधून या संपाच्या बाजूने लिहावे.
  • राऊत यांनी आंदोलकांच्या बाजूने भूमिका घेऊ नये, हे लज्जास्पद आहे.

Tags: adv. gunratna sadavartegopichand padalkarmumbaiSadabhau KhotST Strikestate govtअॅड. गुणरत्न सदावर्तेएसटी संपगोपीचंद पडळकरमुंबईराज्य सरकारसदाभाऊ खोत
Previous Post

संविधान दिनानिमित्त जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

Next Post

अखिल भारतीय दूध उत्पादक समन्वय समितीची स्थापना!

Next Post
all india milk producers co-ordination committee

अखिल भारतीय दूध उत्पादक समन्वय समितीची स्थापना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!