Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“चला करुया संकल्प निरोगी महाराष्ट्राचा” – उपमुख्यमंत्री अजित पवार

जागतिक आरोग्य दिनानिमित्त फिट महाराष्ट्र उपक्रमाला सुरुवात

April 7, 2022
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
जागतिक आरोग्य दिन 2

मुक्तपीठ टीम

आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करुन निरोगी महाराष्ट्राचा संकल्प करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.

जागतिक आरोग्य दिन 1            

राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई महानगरपालिका आणि मेडस्केप इंडिया यांच्यावतीने “संकल्प निरोगी महाराष्ट्राचा” (फिट महाराष्ट्र) उपक्रमाला आज सुरुवात करण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे आवाहन केले. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

            

जागतिक आरोग्य दिनानिमित्त गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या या कार्यक्रमात “संकल्प निरोगी महाराष्ट्राचा” उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

जागतिक आरोग्य दिन 2           

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कोरोना कालावधीत अतिशय चांगले काम केले. मात्र अद्यापही आपल्याला आरोग्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करायच्या आहेत, त्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत.

            

आरोग्याचा आणि विकासाचा एकमेकांशी संबंध आहे. कारण आरोग्यदायी व्यक्ती राज्य आणि देशाच्या विकासासाठी भरीव योगदान देऊ शकते. आपण कोरोनाच्या दोन लाटांवर मात केली. त्या काळातील स्वच्छतेच्या सवयी काळजीपूर्वक जपल्या पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.

जागतिक आरोग्य दिन 3            

बैठ्या जीवनशैलीमुळे आरोग्य समस्या उद्भवत आहेत. यासाठी नियमित व्यायाम, सकस आहार घेतला पाहिजे. तणावमुक्त जगण्यासाठीही विशेष प्रयत्न करायला हवेत. शरीराबरोबरच मनाचे आरोग्य जपण्यासाठीही विशेष प्रयत्न करायला हवेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

            

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, महाराष्ट्र कोरोनाच्या संकटावर मात करून पुढे आला आहे. आता आपण निरोगी महाराष्ट्राचा संकल्प करीत आहोत. यासाठी सर्व नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. नागरिकांच्या जोरावरच आपण कोरोना विरोधातील लढाई जिंकली आहे. त्यामुळे “फिट महाराष्ट्र” संकल्पना नागरिकांच्या जोरावरच साध्य होऊ शकेल, असे सांगितले.

जागतिक आरोग्य दिन           

यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, प्रधान सचिव निलीमा करकेट्टा, आरोग्य आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, आरोग्य सेवा संचालक डॉ साधना तायडे, उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, सहाय्यक संचालक डॉ. पद्मजा जोगेवार, उपसंचालक डॉ कैलास बाविस्कर, सहाय्यक संचालक डॉ. संजीव जाधव आदी उपस्थित होते.


Tags: ajit pawarFit MaharashtraMaharashtraRajesh TopeWorld health dayअजित पवारजागतिक आरोग्य दिनफिट महाराष्ट्रमहाराष्ट्रसार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे
Previous Post

सोमय्यांचा मोर्चा अजित पवारांकडे! पण राऊतांच्या आरोपांवर बाजू मांडत नसल्याने चर्चा!

Next Post

वरळी बिडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाच्या कामात सहकार्याचं गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडांचं आवाहन

Next Post
Jitendra Awhad appeals BDD chawl residents to cooperate with rehabilitation project

वरळी बिडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाच्या कामात सहकार्याचं गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडांचं आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!