Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वरळी बिडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाच्या कामात सहकार्याचं गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडांचं आवाहन

April 7, 2022
in सरकारी बातम्या
0
Jitendra Awhad appeals BDD chawl residents to cooperate with rehabilitation project

मुक्तपीठ टीम

वरळी येथील बिडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.

गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड यांनी आज वरळी येथील बिडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला आणि स्थानिकांसोबत चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या.

उपस्थित चाळवासींयांचे अभिनंदन करून डॉ. आव्हाड पुढे म्हणाले, वरळीच्या लोकांनी शासनावर विश्वास ठेऊन सहकार्य केले आहे. काही लोकांनी करार न करताही स्थानांतर केले आहे. तुम्हा सगळ्यांचे सहकार्य मिळाले तर लवकरच हा पुनर्वसन प्रकल्प पूर्ण होईल. करार करतांना अनेक गोष्टींचा अंतर्भाव करण्यास सांगण्यात आले आहे. शासनावर विश्वास ठेवा. नवीन तंत्रज्ञान वापरून ही इमारत येत्या दोन ते तीन वर्षात तयार होईल.

 

महिलांना भावनिक आवाहन

यावेळी डॉ.आव्हाड यांनी उपस्थित महिलांना भावनिक आवाहन केले. ते म्हणाले, तुम्हाला सुसज्ज स्वयंपाकघर मिळेल, न्हाणीघर आणि मोकळी जागाही मिळेल. सून म्हणून चाळीत येतांना बघितले असेल असे स्वप्न या पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण  होईल. पुरूष मंडळी कामावर निघुन गेल्यावर आपल्याला घरात राहायचे असते. हे असे सुंदर सुसज्ज घर आपणास मिळणार आहे.

इथे उपस्थित जनतेच्या मनातील विविध प्रश्नांना डॉ. आव्हाड यांनी उत्तरे दिली.  सगळे करार लवकर पूर्ण केले जावेत. इथल्या इथेच करार होतील असे पाहिले जाईल. पोलीस खात्यातील अनेक लोक गेली कित्येक वर्ष इथे राहतात. त्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार केला गेला आहे. त्यांनाही इथे घरं मिळणार आहेत. समुद्राचा वारा घरांवरून जाईल. मोकळी जागा जास्त मिळेल. मस्जिद, मंदीर, बुद्धविहारसाठीची जागा आहे तेवढीच राहणार आहे. एकदा प्रकल्प उभा राहिला की इतरांना विश्वास वाटेल.  सगळे करार संकेतस्थळावर टाकण्यात येतील म्हणजे सर्वांना वाचण्यासाठी उपलब्ध होतील. करारनामा प्रत्येकालाच मिळेल. तीन वर्षात घरे तयार होतील ज्या खोलीवर मालकीचे वाद आहेत त्या खोल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने राहतील  असेही डॉ. आव्हाड यांनी रहिवाशांच्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.

यावेळी माजी राज्यमंत्री सचिन अहिर, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी  डॉ. योगेश म्हसे व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.


Tags: BDD ChawlDr Jitendra AvhadResidentsworliडॉ. जितेंद्र आव्हाडवरळी बिडीडी चाळ
Previous Post

“चला करुया संकल्प निरोगी महाराष्ट्राचा” – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

महाराष्ट्रासाठी खतांसाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

Next Post
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना पुष्प गुच्छ देतांना राज्याचे कृषी मंत्री

महाराष्ट्रासाठी खतांसाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!