Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Lata Mangeshkar death 2 days state mourning, public holiday on monday in maharashtra

मुक्तपीठ टीम

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारनेही सकाळीच देशभर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. दोन दिवस सोहळ्यांसारखे कार्यक्रमही होणार नाहीत.

 

यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

 

लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: राज्य सरकारची यंत्रणा आणि मुंबई मनपाला लता मंगेशकरांच्या अखेरचा निरोप देण्यासाठी खास सोय करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिवसेनेचे माहिम मतदारसंघातील स्थानिक आमदार सदा सरवणकर हे शिवाजी पार्कमध्ये वेळेत सर्व उभारलं जावं यासाठी देखरेख करत आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही शिवाजी पार्कवरील तयारीचा आढावा घेतला. वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील हेही तेथे बंदोबस्ताच्या व्यवस्थेची तयारी करत आहेत.

  • भारतरत्न लता मंगेशकर यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्क मैदानात तीन तास ठेवण्यात येणार आहे.
  • त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
  • भारतरत्न लता मंगेशकर यांना राजकीय सन्मानाने त्यांना मुंबई पोलीस दल आणि भारतीय लष्कराकडून शासकीय इतमामाने सलामी देण्यात येणार आहे.
  • त्यामध्ये वीस पोलीस कर्मचारी सामील होतील.
  • पोलीस पथकाकडून ३ राऊंड हवेत फायर केले जाणार आहेत.

Tags: lata mangeshkarMaharashtramumbaiमहाराष्ट्रमुंबईलता मंगेशकरशिवाजी पार्क
Previous Post

“ऐ मेरे वतन के लोगों”: देशाच्या प्रत्येक पिढीचं मन हेलावतं…लतादीदींच्या गाण्यानं नेहरूंच्या डोळ्यात अश्रू, मोदींनीही काढली आठवण!

Next Post

“भारतीय संगीत विश्व आज खऱ्या अर्थाने पोरके!”

Next Post
Singer Lata Mangeshkar

"भारतीय संगीत विश्व आज खऱ्या अर्थाने पोरके!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!