मुक्तपीठ टीम
गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी पूर्ण ताकद लावली आहे. राज्यातील सत्ताधारी भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. द्वारका विधानसभा जागा ही देखील महत्त्वाच्या विधानसभा जागांपैकी एक आहे. द्वारका ही जागा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. २००२, २००७, २०१२ आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार जिंकून आले. आता यावर्षी भाजपाला आपला गड राखण्यात यश येत का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
द्वारका भाजपाचा बालेकिल्ला
- द्वारका विधानसभा पूर्णपणे भाजपाचा मजबूत बालेकिल्ला मानला जातो.
- २००२, २००७, २०१२ आणि २०१७ या विधानसभा निवडणुकीत या जागेवर भाजपाचे कमळ फुलले.
- द्वारका विधानसभा जागा गुजरातमधील देवभूमी दुर्वका जिल्ह्यात येते.
- पबुभा विरंभा माणेक हे भाजपाच्या तिकिटावर आमदार आहेत.
- तर २००२ पूर्वीच्या निवडणुकीत या विधानसभा जागेवर माणेक यांचेच वर्चस्व होते.
गेल्या ३२ वर्षांपासून माणेक यांचाच विजय-
- गुजरातच्या निवडणुकीत यावेळीही भाजपाने पबुभा विरंभा माणेक यांना उमेदवारी दिली आहे.
- मात्र, यावेळी आम आदमी पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने येथे अटीतटीची लढत होऊ शकते, असे मानले जात आहे.
- २०१७ च्या निवडणुकीत द्वारकामध्ये मतदानाची टक्केवारी ४७.२५ होती.
- २०१७ मध्ये विरंभा माणेक यांनी भाजपाच्या तिकिटावर काँग्रेसचे उमेदवार अहिर मेरामण मरखी यांचा पराभव केला.
- माणेक यांनी मारखी यांचा ५७३९ मतांनी पराभव केला.
- गेल्या निवडणुकीत अनेक अधिक उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते, मात्र भाजपचाच उमेदवार विजयी झाला होता.
- गेल्या ३२ वर्षांपासून माणेक यांना कोणीही पराभूत करू शकलेले नाही.
माणेक हे पुजारी कुटुंबातील –
- पबुभा विरंभा माणेक हे पुरोहित कुटुंबातील आहेत.
- १९९० मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि तेव्हापासून ते कधीही निवडणूक हरले नाहीत.
- द्वारका ही जागा गेल्या १० वर्षांपासून भाजपाकडे आहे, तर पबुभा विरंभा माणेक यांच्याकडे ३२ वर्षांपासून आहे.
- माणेक यांनी पहिल्या तीन निवडणुका अपक्ष म्हणून जिंकल्या, नंतर ते काँग्रेसमध्ये गेले.
- नंतर २०१२ आणि २०१७ च्या निवडणुका भाजपाच्या तिकिटावर जिंकल्या.