मुक्तपीठ टीम
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावी. धारावीतील ८० टक्के रहिवाशी हे सार्वजनिक शौचालयांवर अवलंबून असतात. धारावी रहिवाशांना स्वच्छतागृह महासंकुलाचा लाभ मिळणार आहे. हे मुंबईतील सर्वात मोठे सार्वजनिक शौचालय असणार आहे. महापालिकेने धारावी येथे दोन मजली सुविधा केंद्र उभारण्याची योजना आखली आहे.
मुंबईतील या सर्वात मोठ्या सार्वजनिक स्वच्छतागृहात फक्त १११ शौचालय युनिट्सच नाहीच तर आंघोळीसाठी जागा आणि वॉटर एटीएम असेल. तेवढेच नव्हे तर डिटर्जंटसह आधुनिक लाँड्री सुविधाही असतील. या प्रकल्पासाठी ९ कोटी रुपये खर्च केले जातील. २ हजार ६०० चौरस मीटर जागेमध्ये, मनपाने हिंदुस्तान युनिलिव्हरच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रकल्पाचा एक भाग म्हणून या केंद्राची योजना आखली आहे. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीला या स्वच्छता महासंकुलाच्या शुभारंभाची योजना आहे.
धारावीतील हे सुविधा केंद्र वैयक्तिक स्वच्छतेच्या समस्या, कपडे धुण्याच्या समस्या, स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या समस्या आणि इतर समस्यांचे निराकरण करेल.
कम्युनिटी टॉयलेट्समध्ये महिला, पुरुष आणि मुलांसाठी १०० फ्लशिंग टॉयलेट्स तसेच अपंग लोकांसाठी सुलभ शौचालय असतील.
मनपाच्या जी उत्तर विभागाचे सहाय्यक नगरपालिका आयुक्त किरण दिघावकर म्हणाले की, या सुविधेत ग्रे वॉटर सुविधा देखील उपलब्ध आहे. हे पाणी पिण्याशिवाय अन्य कामांसाठी वापरले जाऊ शकते.
या स्वच्छतागृहात नाममात्र दराने पाणी दिले जाईल. पाच जणांचे कुटुंब एका महिन्यासाठी १५० रुपये दराने स्वच्छतागृहातील सुविधांचा लाभ घेऊ शकेल. मुलांना स्वच्छतागृहांमध्ये मोफत प्रवेश मिळेल.
पाहा व्हिडीओ: