Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त कमांडर परिषदेत सेनेतील कनिष्ठही सहभागी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
military (2)

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील केवडीया येथे संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या संयुक्त कमांडर्स परिषदेच्या सांगता समारंभाला नुकतेच संबोधित केले. या परिषदेत ज्युनियर कमिशन्ड अधिकारी आणि नॉन कमिशन्ड अधिकाऱ्यांना या परिषदेत सहभागी करुन घेतल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. आतापर्यंत या परिषदेत सेना प्रमुख आणि कमांडर-इन-चीफ दर्जाचे अधिकारी हेच सहभागी होत असत.

परिषदेत सैन्याच्या कामाची पद्धत, प्रत्यक्ष कसे काम करतात, अशा वेगवेगळ्या बाबींवर पंतप्रधानांनी कनिष्ठांशीही चर्चा केली. कॉन्फरन्समध्ये कनिष्ठांना समाविष्ट करण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाकडूनच आली होती.

military (3)
चीनशी झालेल्या चकमकीच्या वेळी सैनिकांचा सल्ला कामाला आला-
सूत्रांच्या माहितीनुसार, संयुक्त कमांडर कॉन्फरन्समध्ये ज्यूनिअर कमिशंड अधिकारी, नॉन-कमिशंड अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यांना काही विषय देखील दिले गेले आहेत ज्यावर त्यांनी मांडणी केली. चीनबरोबर नुकत्याच झालेल्या चकमकीदरम्यान फिल्डवरील सैनिकांचा सल्ला खूप उपयोगी ठरला. लष्कराला याचा मोठा फायदा झाला होता.

मोदींनी कंबाइन्ड कॉन्फरन्सचे रूप बदलले
पंतप्रधानांनी संयुक्त कमांडर कॉन्फरन्सची रचना बदलण्याचे काम सुरू केले आहे. यापूर्वी या परिषदा साऊथ ब्लॉकमध्ये घेतल्या गेल्या, परंतु आता मोदींनी हे ऑपरेशनल बेसवर सुरू केले आहे. २०१४ मध्ये मोदींनी प्रथमच या परिषदेला संबोधित केले. यानंतर हे आयएनएस विक्रमादित्य, इंडियन मिलिटरी अॅकेडमी, देहरादून आणि जोधपूर एअरबेसमध्ये केले गेले आहे. यावेळी ही परिषद गुजरातमधील केवडियामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीसमोर होती.

राष्ट्रीय संरक्षण व्यवस्थेत, सर्वोच्च नागरी आणि लष्करी नेतृत्वाशी बोलतांना पंतप्रधानानी गेल्या वर्षी, उत्तर सीमेवरील आव्हानात्मक परिस्थिती आणि कोविडच्या संकटकाळात, भारतीय सैन्यदलांनी दाखवलेल्या समर्पण वृत्ती आणि निश्चयाविषयी कौतुक व्यक्त केले.
पंतप्रधानांनी यावेळी राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेत स्वदेशीचा अंगीकार आणि वापर वाढण्याच्या महत्वावर भर दिला. केवळ लढावू उपकरणे आणि शस्त्रेच नाही, तर सैन्यदलांमध्ये असलेल्या सैद्धांतिक, प्रक्रिया आणि पद्धतींमध्येही स्वदेशीचा पुरस्कार व्हावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

military (1)
राष्ट्रीय सुरक्षेची रचना करतांना लष्करी आणि नागरी भागातही मनुष्यबळ नियोजन अधिकाधिक उत्तम करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच नागरीजीवन आणि सैन्य यांच्यातील भिंती दूर करून एकत्रित काम करण्यावर तसेच, सर्वसमावेशक दृष्टीकोन ठेवण्याचा त्यांनी सल्ला दिला. तसेच, निर्णयप्रक्रियेची गती वाढवली जावी, असेही ते म्हणाले. लष्करी दलांनी परंपरेने चालू असलेल्या कालबाह्य, निरुपयोगी पद्धतीतून आता मुक्त व्हावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

 

सध्या वेगाने बदलत असलेल्या तंत्रज्ञानाची दाखल घेत, पंतप्रधान म्हणाले की, या अनुषंगाने भारतीय लष्करालाही ‘भविष्यातील शक्ती’ होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
पुढच्या वर्षी देश आपल्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करणार आहे, हे सांगत, यानिमित्त असे काही विशेष उपक्रम आणि कार्यक्रम राबवावेत ज्यातून युवकांना प्रेरणा मिळेल, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: combined commanders conference 2021military commandersprime minister narendra modiज्यूनिअर कमिशंड अधिकारीपंतप्रधान नरेंद्र मोदीसंयुक्त कमांडर्स परिषद
Previous Post

धारावीत सर्वात मोठं स्वच्छतागृह संकुल, १११ शौचकुप, कपडे धुण्याचीही सोय

Next Post

पुणे महानगरपालिकेत १२४ जागांसाठी भरती, ८वी ते पदवीधरांना संधी

Next Post
pune bmc (2)

पुणे महानगरपालिकेत १२४ जागांसाठी भरती, ८वी ते पदवीधरांना संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!