Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आकाशातून बदाबदा पाणी…शेतीवर डोंगर कोसळला! शेती गाडली गेल्याने शेतकरी हतबल!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Landslide In Junnar; Damage 30 Acre Land

मुक्तपीठ टीम

शेतकरी जेवढी पावसाची वाट पाहतो तेवढी कदाचित चातकही वाट पाहत नसेल. पण हाच पाऊस जेव्हा धसमुसळेपणाने अंगात काही तरी संचारल्यासारखा कोसळतो तेव्हा होतं होत्याचं नव्हतं होतं. पुण्यातील आंबेगाव जुन्नर परिसरात मुसळधार पावसाच्या संततधारेने भूस्खलन झाले. त्यात ३० एकर भातशेती मातीच्या ढिगाऱ्यांखाली गाडली गेली. या आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. या आपत्तीची ही खास बातमी…

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह पुण्यात पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातील आदीवासी भागात भूस्खलनानाने जवळपास २५ ते ३० एकर भातशेती वाहून गेली आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

शेतकरी अशोक शेळके यांची संपूर्ण भात शेती मातीखाली गाडून गेली आहे,त्यामुळे अतिवृष्टीचा फटका सगळ्यात जास्त पश्चिम आदिवाशी पट्यात बसला आहे. महसूल विभागाने पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. आदिवासी भागात भात हे महत्त्वाचे पिक आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांची उपजीवीका भात शेतीवर अवलंबून असते. भूस्खलाने शेती वाहून गेल्याने आता वर्षभर खायचं काय असा प्रश्न या आदिवासी शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. राज्य सरकारने पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी

अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे शेतकरी संकटात आले आहेत. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची गरज आहे. तरी अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून तळेरान येथील भूस्खलनामुळे भातशेती गाडली जाऊन झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.

गेल्या आठवडाभरापासून उत्तर पुणे जिल्ह्यात पावसाची धो धो पाऊस आहे. पावसाने भीमा नदीला आलेल्या पुरात शिरूर तालुक्यातील नागरगाव येथील एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला असून गुरूवारी सायंकाळी भिमा नदिवरती मासेमारी करत असताना लक्ष्मण जाधव हे पुराच्या पाण्यात वाहून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Havey RainfallJunnarLandsliderice farmingआदिवासी  शेतकरीजून्नरभातशेतीभूस्खलनमुसळधार पाऊस
Previous Post

न्यायमूर्ती म्हणाले, “मुलं सकाळी लवकर शाळेत जातात…” आणि सर्वोच्च न्यायालयाचेही काम लवकर सुरु!

Next Post

महापूरही नवरदेवाला रोखू शकला नाही! पुराच्या पाण्यातून नवरदेवाचा थर्माकोलवरून प्रवास!! मुहूर्तावरच हळद!!

Next Post
Marriage in Flood Water

महापूरही नवरदेवाला रोखू शकला नाही! पुराच्या पाण्यातून नवरदेवाचा थर्माकोलवरून प्रवास!! मुहूर्तावरच हळद!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!