Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

न्यायमूर्ती म्हणाले, “मुलं सकाळी लवकर शाळेत जातात…” आणि सर्वोच्च न्यायालयाचेही काम लवकर सुरु!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Judge U U lalit

मुक्तपीठ टीम

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यू. यू. ललित हे देशाचे पुढचे सरन्यायाधीश होण्याची शक्यता आहे. त्यांनी पाडलेला नवा पायंडा भविष्याबद्दल नव्या आशा जागवणारा आहे. न्यायमू्र्ती ललित यांनी शाळकरी मुलांचं उदाहरण न्यायालयात दिलं. ते म्हणाले, “मुलं सकाळी लवकर ७ वाजता शाळेत जातात, तर मग आपण सकाळी लवकर काम का सुरु करु शकत नाही? त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तासभर लवकर काम सुरु केलं!

न्यायमूर्ती यू यू ललित यांनी न्यायालयाच्या कामकाजात शाळकरी मुलांचा उल्लेख केला . ते म्हणाले, सकाळी सात वाजता मुले शाळेत जाऊ शकतात, मग आम्ही का नाही लवकर येऊ शकत. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नेहमीपेक्षा एक तासापूर्वी कामाला सुरुवात केली. जे लोक वेळेवर कार्यालयात पोहोचत नाहीत किंवा ठरलेल्या वेळेपूर्वी काम टाळतात त्यांच्यासाठीही न्या. ललित यांचा हा सल्ला आहे. न्यायमूर्ती यू. यू. ललित, न्यायमूर्ती एस. रवींद्र भट आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने सकाळी साडेनऊ वाजता या प्रकरणांची सुनावणी सुरू केली. साधारणपणे न्यायालयाचे कामकाज सकाळी साडेदहा वाजता सुरू होते.

न्यायमूर्ती ललितांचे लवकर काम, लवकर आराम!

  • सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आठवड्यातील कामकाजाच्या दिवशी सकाळी साडेदहा ते दुपारी चार या वेळेत खटल्यांची सुनावणी करतात.
  • त्याऐवजी काम लवकर सुरू केले तर संध्याकाळी त्याचा फायदा होईल
  • न्यायालयाचे काम सुरू करण्यासाठी योग्य वेळ सकाळी ९.३० आहे, असे मला म्हणायचे आहे.
  • दुसऱ्या दिवशीच्या खटल्यांचा अभ्यास करण्यासाठी संध्याकाळी अधिक वेळ मिळेल.
  • न्यायालये सकाळी ९ वाजता कामकाज सुरू करू शकतात आणि ११.३० वाजता एक तासाच्या विश्रांतीसह दुपारी २ वाजेपर्यंत दिवसाचे कामकाज संपवू शकतात.
  • असे केल्याने न्यायाधीशांना संध्याकाळी अभ्यास वगैरे काम करण्यासाठी अधिक वेळ मिळेल.

ललित पुढचे सरन्यायाधीश!

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण हे २६ ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. त्यांच्यानंतर ललित हे पदभार स्वीकारतील आणि ते या वर्षी ८ नोव्हेंबरपर्यंत सरन्यायाधीश म्हणून कार्यरत राहतील.


Tags: Justice UU LalitSchoolstudentssuprem courtन्यायमूर्ती यू यू ललितविद्यार्थीशाळासरन्यायाधीशसर्वोच्च न्यायालय
Previous Post

सरकार गेलं, पण अर्थसंकल्पात विधवा महिलांसाठीच्या दोन योजना रखडल्या!

Next Post

आकाशातून बदाबदा पाणी…शेतीवर डोंगर कोसळला! शेती गाडली गेल्याने शेतकरी हतबल!

Next Post
Landslide In Junnar; Damage 30 Acre Land

आकाशातून बदाबदा पाणी...शेतीवर डोंगर कोसळला! शेती गाडली गेल्याने शेतकरी हतबल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!