Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकरी हत्याकांड आरोपी केंद्रीय गृहराज्यमंत्री पुत्र आशिष मिश्रा मिशा पिळत न्यायालयात!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
ashish mishra

मुक्तपीठ टीम

गेल्या वर्षी ३ ऑक्टोबरला लखीमपूर खेरी हिंसाचारात चार शेतकरी आणि एका पत्रकारासह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा हा या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. आशिषला यायालयात हजर करण्यात आले. पोलीस कोठडीत कोर्टात हजर केले जात असताना तो मिशा पिळताना दिसला. तुरुंगात असलेल्या आशिषच्या या स्टाइलचा फोटो आणि व्हिडीओ मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष मिश्राच्या हजेरीनंतर अंकित दास, सुमित जयस्वाल यांच्यासह अन्य आरोपींनाही न्यायालयात हजर करण्यात आले. आशिष मिश्रा यांनी पोलीस कोठडीत मिशी पिळल्याचे चित्र उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने खेरी येथील टिकुनिया प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान त्यांच्या बेजबाबदार विधानांवर जोरदार टीकास्त्र सोडल्यानंतर समोर आले आहे. नेते केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी प्रति शपथपत्रानुसार कथित विधान दिले नसते तर ही घटना घडली नसती असे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपपत्राचा संदर्भ देत न्यायालयाने म्हटले की, शेतकरी शांततेने आंदोलन करत होते. न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह यांच्या एकल खंडपीठाने याप्रकरणी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा ‘टेनी’ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यावर टीका केली.

यासोबतच काल न्यायालयाने या प्रकरणातील चार आरोपी अंकित दास, सुमित जैस्वाल, लवकुश आणि शिशुपाल यांचे जामीन अर्ज फेटाळले होते. आरोपींविरुद्ध उपलब्ध सबळ पुरावे पाहता त्यांची जामिनावर सुटका करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आशिषला सरेंडर व्हावे लागले

  • लखीमपूर प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला २८ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर १५ फेब्रुवारीला उच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता.
  • १८ एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्याला आठवडाभरात सरेंडर करण्याचे आदेश दिले.
  • ६८ दिवसांच्या जामिनावर बाहेर राहिल्यानंतर, आशिष मिश्राने २४ एप्रिल रोजी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सरेंडर केले.

Tags: accused Ashish Mishra TennyFarmer massacreLakhimpur Kheri farmer massacremuktpeethSupreme CourtUnion Home Minister son Ashish Mishraआरोपी आशिष मिश्रा टेनीकेंद्रीय गृहराज्यमंत्री पुत्र आशिष मिश्रामुक्तपीठलखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांडशेतकरी हत्याकांडसर्वोच्च न्यायालय
Previous Post

आता योगी सरकारचं मुंबईत कार्यालय: “यूपीत गुंतवणूक, मुंबईतील यूपीवाल्यांचं हित, सामाजिक सुरक्षेचं रक्षण!”

Next Post

आपण राज्यात शांती, प्रेम प्रस्थापित राखत सामाजिक एकोपा जपूया – जयंत पाटील

Next Post
Jayant Patil

आपण राज्यात शांती, प्रेम प्रस्थापित राखत सामाजिक एकोपा जपूया - जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!