मुक्तपीठ टीम
गेल्या वर्षी ३ ऑक्टोबरला लखीमपूर खेरी हिंसाचारात चार शेतकरी आणि एका पत्रकारासह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा हा या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. आशिषला यायालयात हजर करण्यात आले. पोलीस कोठडीत कोर्टात हजर केले जात असताना तो मिशा पिळताना दिसला. तुरुंगात असलेल्या आशिषच्या या स्टाइलचा फोटो आणि व्हिडीओ मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष मिश्राच्या हजेरीनंतर अंकित दास, सुमित जयस्वाल यांच्यासह अन्य आरोपींनाही न्यायालयात हजर करण्यात आले. आशिष मिश्रा यांनी पोलीस कोठडीत मिशी पिळल्याचे चित्र उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने खेरी येथील टिकुनिया प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान त्यांच्या बेजबाबदार विधानांवर जोरदार टीकास्त्र सोडल्यानंतर समोर आले आहे. नेते केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी प्रति शपथपत्रानुसार कथित विधान दिले नसते तर ही घटना घडली नसती असे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपपत्राचा संदर्भ देत न्यायालयाने म्हटले की, शेतकरी शांततेने आंदोलन करत होते. न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह यांच्या एकल खंडपीठाने याप्रकरणी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा ‘टेनी’ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यावर टीका केली.
यासोबतच काल न्यायालयाने या प्रकरणातील चार आरोपी अंकित दास, सुमित जैस्वाल, लवकुश आणि शिशुपाल यांचे जामीन अर्ज फेटाळले होते. आरोपींविरुद्ध उपलब्ध सबळ पुरावे पाहता त्यांची जामिनावर सुटका करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आशिषला सरेंडर व्हावे लागले
- लखीमपूर प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला २८ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर १५ फेब्रुवारीला उच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता.
- १८ एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्याला आठवडाभरात सरेंडर करण्याचे आदेश दिले.
- ६८ दिवसांच्या जामिनावर बाहेर राहिल्यानंतर, आशिष मिश्राने २४ एप्रिल रोजी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सरेंडर केले.