Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जगातील सर्वात मोठा खादी भारतीय राष्ट्रध्वज! खादी ग्रामोद्योगचा नवा विक्रम!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
kvic

मुक्तपीठ टीम

खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाने लेहमध्ये एक नवा विक्रम साकारला आहे. तिथं उंच पर्वतांवर खादीचा जगातील सर्वात मोठा तिरंगा राष्ट्रध्वज तयार करण्यात आला आहे. खादीला सर्वात पर्यावरण-स्नेही कापड म्हणून ओळखले जाते. या खादीची देणगी जगाला देणाऱ्या महात्मा गांधीजींना सर्वात भव्य आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाने हा स्मारकरुपी भव्य राष्ट्रध्वज तयार केला आहे.

 

हा स्मारकरुपी भव्य राष्ट्रध्वज 225 फूट लांब, 150 फूट रुंद आहे आणि त्याचे वजन (अंदाजे) 1400 किलो आहे.खादीचे काम करणारे कारागीर आणि संबंधित कामगारांनी जवळजवळ 3500 तास अतिरिक्त काम करून हा भव्य राष्ट्रध्वज तयार केला आहे. एकूण 33,750 चौरस फूट क्षेत्रफळ असलेला हा विशाल ध्वज तयार करण्यासाठी 4600 मीटर इतक्या प्रचंड लांबीचे हाताने विणलेले खादीचे तागे वापरण्यात आले. या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्राचा व्यास 30 फूट आहे. हा राष्ट्रध्वज तयार करण्यासाठी 70 खादी कारागीर 49 दिवस काम करीत होते.

 

या राष्ट्रध्वजाचे अनावरण लडाखचे नायब राज्यपाल आर.के.माथुर यांनी केले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की हा स्मारकरुपी राष्ट्रध्वज देशभक्तीच्या प्रेरणेने प्रत्येक भारतीयाला एकत्र बांधून ठेवेल. केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना, लडाखमधील संसद सदस्य जे टी नामग्याल आणि भारतीय लष्कर प्रमुख एमएम नरवणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

खादीचा अतिभव्य राष्ट्रध्वज कशासाठी?

  • देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे देशाच्या ‘स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी केव्हीआयसीने या प्रचंड ध्वजाची संकल्पना आखली आणि त्यानुसार हा राष्ट्रध्वज तयार करण्यात आला.
  • राष्ट्रध्वजाची हाताळणी तसेच प्रदर्शन अत्यंत काळजीपूर्वक आणि अचूकतेने होणे आवश्यक असल्यामुळे केव्हीआयसीने हा राष्ट्रध्वज भारतीय लष्कराकडे सुपूर्द केला.
  • लष्कराच्या जवानांनी मुख्य लेह शहरातील उंच डोंगरमाथ्यावर हा राष्ट्रध्वज प्रदर्शित केला.

 

कसा आहे विश्वविक्रमी राष्ट्रध्वज?

  • या राष्ट्रध्वजाला जमिनीचा स्पर्श होऊ देऊ नये म्हणून लष्कराने ध्वज प्रदर्शित करण्यासाठी चौकटीचा वापर केला आहे.
  • या ध्वजाला चारही बाजूंनी नेफा जोडण्यात आला असून त्यासाठी 12 मिलीमीटरची दोरी वापरण्यात आली आहे.
  • या ध्वजासाठी वरच्या आणि खालच्या बाजूला प्रत्येकी 3 तसेच डाव्या आणि उजव्या बाजूला प्रत्येकी 3 अशा उच्च दर्जाच्या एकूण 12 नायलॉन दोऱ्या वापरण्यात आल्या आहेत.
  • त्यांनी सुमारे 3000 किलो वजन घेण्याच्या क्षमतेसह ध्वजाचे वजन विभागून घेतले आहे.

 

तसेच, यापैकी प्रत्येक दोरीला दोन्ही बाजूंना फास ठेवण्यात आले असून त्यांच्या मदतीने ध्वजाचे वजन एकत्रितपणे पेलता येते आहे. ध्वजाचे सर्व भाग एकमेकांना जोडून शिवून घेतले आहेत आणि नेफ्यामधील दोरी दिसणार नाही अशा बेताने हे जोड शिवण्यात आले आहेत. नेफ्याची आतली किनार रासायनिक लेप लावलेल्या खादीच्या तुकड्यापासून तयार केली आहे जेणेकरून दोऱ्या हलताना होणारे घर्षण कमी होईल आणि ध्वजाच्या कापडाची हानी होणार नाही. राष्ट्रध्वजाच्या रंगांमध्ये मिसळून जाण्यासाठी नेफा देखील तिरंगीच वापरण्यात आला आहे.

 

पंतप्रधानांनी केले जगातील सर्वात मोठ्या खादीच्या राष्ट्रीय ध्वजाचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली म्हणून लेह, लडाखमध्ये प्रदर्शित केलेल्या जगातील सर्वात मोठ्या खादीच्या राष्ट्रीय ध्वज तयार करण्याच्या (225 फूट उंची आणि 150 फूट रुंदी असलेल्या) खादी ग्रामोद्योग आयोगाच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले, “खादीविषयी विशेष आत्मियता असणाऱ्या आदरणीय बापूंना ही एक अनोखी श्रद्धांजली आहे.
या सणासुदीच्या काळात, खादी आणि हस्तकला उत्पादनांना आपल्या जीवनातील अविभाज्य घटक भाग बनवण्याचा विचार करा आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचा संकल्प बळकट करा.”

 

पाहा व्हिडीओ:


Tags: gandhi jayantiindian national flagKVICmuktpeethpmo narendra modiखादी आणि ग्रामोद्योग आयोगगांधी जयंतीपंतप्रधान नरेंद्र मोदीमुक्तपीठलेह
Previous Post

भाला फेक स्टायलीत स्कुबा डायव्हिंग…नीरज चोप्राचा वायरल व्हिडीओ!

Next Post

लवकरच लाँच होणार ‘मेड इन इंडिया’ मर्सिडिझ बेंझ एस क्लास कार!

Next Post
कार

लवकरच लाँच होणार ‘मेड इन इंडिया’ मर्सिडिझ बेंझ एस क्लास कार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!