Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आपलंच काश्मीर सोडण्याचं का बोलू लागलेत काश्मिरी पंडित?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
KPPS Rally In Kashmir

मुक्तपीठ टीम

काश्मीरमधील शोपियानमध्ये मंगळवारी दोन काश्मिरी पंडितांवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये एकजण मरण पावला तर अन्य एकजण जखमी झाला आहे. हिंदूच्या हत्येनंतर, काश्मिरी पंडित संघर्ष समितीने (केपीएसएस) खोऱ्यात राहणाऱ्या सर्व काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडण्याचे आवाहन केले आहे. केपीएसएसचे अध्यक्ष संजय टिक्कू यांनी सांगितले की, खोऱ्यातील आणखी एका काश्मिरी हिंदूवर झालेल्या हल्ल्याने हे सिद्ध झाले आहे की, काश्मीरमध्ये राहणार्‍या प्रत्येक काश्मिरी पंडिताला मारण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे. अशा परिस्थितीत पंडितांनी काश्मीर खोरे सोडून दुसरीकडे जाण्याचा विचार करावा, अन्यथा दहशतवादी आपल्या सर्वांना ठार मारतील.

केपीएसएस ही काश्मिरी पंडितांची संघटना आहे, ज्यांनी काश्मीरमधील दहशतवादी हिंसाचाराच्या कळस गाठला गेला होता तेव्हाही काश्मीरमधून स्थलांतर केले नाही. अलीकडच्या काळात काश्मिरी पंडितांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. केपीएसएस प्रमुख संजय टिक्कू म्हणाले की, काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर दहशतवाद्यांनी केलेल्या आणखी एका हल्ल्याद्वारे, दहशतवाद्यांनी हे स्पष्ट केले आहे की, ते काश्मीर खोऱ्यातील सर्व काश्मिरी पंडितांना ठार मारतील.
संजय टिक्कू यांनी गेल्या वर्षी सांगितले होते की, बडगाम, अनंतनाग आणि पुलवामा यांसारख्या भागातून जवळपास ५०० किंवा त्याहून अधिक लोकांनी बाहेर पडायला सुरुवात केली आहे. काही बिगर काश्मिरी पंडित कुटुंबेही निघून गेली आहेत.

काश्मिरी पंडितांमध्ये वाढला रोष!

  • शोपियान जिल्ह्यातील छोटीपुरा भागामध्ये सफरचंदाच्या बागेत काम करणाऱ्या या दोन काश्मिरी पंडित भावांवर गोळ्या झाडण्यात आल्या.
  • या गोळीबारामध्ये एकजण मरण पावला तर अन्य एकजण जखमी झाला आहे.
  • जखमी भावाला तातडीने नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असले तरी त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे.
  • या घटनेनंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
  • या घटनेनंतर काश्मिरी पंडित संघर्ष समिती (केपीएसएस) आक्रमक झाली असून हे वाढते हल्ले लक्षात घेता समाजबांधवांनी काश्मीर खोरे सोडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
  • काश्मीर खोऱ्यातील सगळ्याच पंडितांना जीवे मारण्याचा दहशतवाद्यांचा विचार आहे, असे ‘केपीएसएस’चे प्रमुख संजय टिक्कू यांनी सांगितले.
  • काश्मिरी पंडितांनी आता खोरे सोडून जम्मू किंवा दिल्लीसारख्या सुरक्षित ठिकाणांवर आश्रय घ्यावा असेही त्यांनी नमूद केले.
  • मागील ३२ वर्षांपासून आम्ही ही परिस्थिती पाहतो आहोत.
  • सरकारला काश्मिरी पंडित अल्पसंख्याक समुदायाला संरक्षण देण्यामध्ये अपयश आले असून आम्ही आणखी किती काळ अशा पद्धतीने मरायचे? हे खूप झाले, असा रोषही त्यांनी व्यक्त केला.

Tags: HinduKashmirKashmiri PanditsKPSSकाश्मिरी पंडितकाश्मिरी पंडित संघर्ष समितीकाश्मीरकेपीएसएसशोपियानहिंदू
Previous Post

लता दीदींच्या जयंती दिनी २८ सप्टेंबरला संगीत महाविद्यालय सुरू करण्याचे निर्देश

Next Post

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना कृषीसंबधी माहिती देण्याचे अब्दुल सत्तारांचे निर्देश

Next Post
कृषी विभाग आढावा बैठक (2)

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना कृषीसंबधी माहिती देण्याचे अब्दुल सत्तारांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!