Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना कृषीसंबधी माहिती देण्याचे अब्दुल सत्तारांचे निर्देश

August 17, 2022
in सरकारी बातम्या
0
कृषी विभाग आढावा बैठक (2)

मुक्तपीठ टीम

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाने गावागावात जाऊन शेतकऱ्यांना कृषीसंबंधी माहिती द्यावी, असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रालयात आज वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी चांगल्या वानांची बियाणे, पीक विमा, किटक नाशके, खते, शासनाच्या कृषी योजना, नवनवीन कृषी संशोधन यासंबंधीची माहिती शेतकऱ्यांना गावागावात जाऊन द्यावी म्हणजे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळून त्यांचे आत्महत्येचे प्रमाण कमी होईल, असे सांगितले.

शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या वानाची माहिती, खत कोणते वापरावे, कृषी संबंधी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळेल यासंबंधीची माहिती द्यावी. ग्रामसभा आणि कार्यशाळेच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी कृषीसहायकांना आराखडा आखून देण्यात यावा, अशा सूचनाही कृषी मंत्र्यांनी केल्या. अतिवृष्टी आणि किड प्रादूर्भावामुळे झालेल्या नुकसानीच्या पीक विम्याचे पैसे मिळण्यासाठी त्वरीत पंचनामे करुन त्यासंबंधीचे प्रस्ताव विमा कंपन्यांकडे पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

कृषी विद्यापिठाने नवनवीन संशोधन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, विविध बियाणे कंपन्यांची तुलना करुन जास्त उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची शेतकऱ्यांना माहिती द्यावी. इस्त्रायल सारख्या देशाच्या शेतीचा अभ्यास करुन त्या धर्तीवर येथील शेतीमध्ये बदल घडवावा, अशा सूचनाही श्री. सत्तार यांनी यावेळी केल्या. राज्याच्या काही भागात पिकांवर गोगलगाईसारख्या किडीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल याबाबत मी स्वत: पाहणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अधिकाऱ्यांनी विभागवार सादरीकरण करुन राज्यातील कृषी क्षेत्राची माहिती दिली. या बैठकीला कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त, पुणे, कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण),पुणे, कृषी संचालक (मृदसंधारण), पुणे, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण), पुणे, कृषी संचालक (कृषी प्रक्रिया/नियोजन), पुणे, कृषी संचालक(फलोत्पादन), पुणे, कृषी संचालक (आत्मा), पुणे आदी उपस्थित होते.


Tags: Agriculture DepartmentfarmersMinister Abdul Sattarकृषी विभागमंत्री अब्दुल सत्तारशेतकरीशेतकरी आत्महत्या
Previous Post

आपलंच काश्मीर सोडण्याचं का बोलू लागलेत काश्मिरी पंडित?

Next Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाची रिक्त पदे लवकरच भरू – शंभूराज देसाई

Next Post
राज्य उत्पादन शुल्क आढावा बैठक (3)

राज्य उत्पादन शुल्क विभागाची रिक्त पदे लवकरच भरू - शंभूराज देसाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!