Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कुडाळमध्ये ‘कोकण काथ्या महोत्सव’, काथ्या कलाकारांच्या कलेच्या माध्यमातून जागरुकतेचा प्रयत्न

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Konkan Kathya Festival

मुक्तपीठ टीम

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते कुडाळ येथे आयोजित “कोकण काथ्या महोत्सवा”चे आज उदघाटन करण्यात आले. काथ्या मंडळाच्या वतीने कुडाळ येथे २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

 

या महोत्सवात कोकणातील काथ्या कलाकारांच्या कलाविषयक क्षमतांचे प्रदर्शन करण्यासोबतच संपूर्ण भारतातील काथ्या कारागीरांच्या कलेचे देखील दर्शन घेता येईल. काथ्या मंडळ या प्रदर्शनात विविध उत्पादने, त्यांचे उपयोग आणि त्यांच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारी यंत्रे यांच्याविषयी माहिती देखील सादर करत आहे. काथ्या उद्योगाविषयी कोकणात अधिक जागरुकता निर्माण करण्यासाठी काथ्या मंडळाच्या वतीने महोत्सव कालावधीत विविध कार्यशाळा, चर्चासत्रे, प्रदर्शन फेरी, उद्योजकता विकास कार्यक्रम यांचे आयोजनही करण्यात आले आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार आणि केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे आणि काथ्या मंडळ यांच्या दिशानिर्देशांना अनुसरून कोकण विभागात काथ्या उद्योगाचा विकास करण्यासाठी कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

 

एमएसएमई उद्योग रोजगार संधींची निर्मिती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असून देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात मोठे योगदान देत आहेत. काथ्यापासून तयार केलेल्या विविध उत्पादनांच्या उपयोगाबाबत काथ्या उद्योग नवनवे मार्ग शोधून काढत असून संबंधित योजना आणि सेवा लोकप्रिय करून आता या उद्योगाचा विस्तार संपूर्ण देशात होत आहे आणि त्यातून अधिक रोजगार संधींची निर्मिती होत आहे.

 

काथ्या मंडळाचं काम काय?

  • देशातील काथ्या उद्योगाच्या समग्र शाश्वत विकासासाठी भारत सरकारने काथ्या उद्योग कायदा १९५३ अन्वये काथ्या मंडळाची स्थापना केली.
  • या कायद्याअंतर्गत नेमून दिलेल्या मंडळाच्या कार्यामध्ये शास्त्रीय, तंत्रज्ञानविषयक आणि आर्थिक संशोधनासाठी अधिग्रहण, मदत आणि प्रोत्साहन देणे, आधुनिकीकरण, दर्जात्मक सुधारणा, मनुष्यबळ विकास, विपणन प्रोत्साहन आणि या उद्योगाशी संबंधित असलेल्या सर्वांचे कल्याण यांचा समावेश आहे.
  • केरळमधील कोची येथे एम.जी.रस्त्यावरील काथ्या भवन येथे काथ्या मंडळाचे मुख्य कार्यालय आहे.
  • या कार्यालयाच्या अखत्यारीत देशभरातील २९ दुकानांसह एकूण ४८ आस्थापना सध्या कार्यरत आहेत.
  • गेल्या ६० वर्षांहून अधिक काळात काथ्या मंडळ, या उद्योगाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहे.
  • हा उद्योग आज देशातील ग्रामीण भागात आर्थिक विकास घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावत आहे.
  • अनेक वर्षांपर्यंत काथ्या उद्योग केरळ राज्यात एकवटलेला होता मात्र आता काथ्या मंडळाच्या प्रयत्नांमुळे या उद्योगाची वाढ देशाच्या इतर भागात देखील होताना दिसत आहे.

Tags: Awareness through Artgood newsKathya ArtistKathya MandalKonkan Kathya FestivalkudalmuktpeethUnion Minister Narayan Raneकलेच्या माध्यमातून जागरुकताकाथ्या कलाकारकाथ्या मंडळकुडाळकेंद्रीय मंत्री नारायण राणेकोकण काथ्या महोत्सवचांगली बातमीमुक्तपीठ
Previous Post

राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन १६ मार्चपर्यंत सामान्य लोकांसाठी खुले राहणार! कसा मिळवाल प्रवेश पत्र?

Next Post

“माझे मत-माझे भविष्य, एका मताचे सामर्थ्य, ’पहिली राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा

Next Post
Mumbai Suburban Collector Nidhi Chaudhary

"माझे मत-माझे भविष्य, एका मताचे सामर्थ्य, ’पहिली राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!