मुक्तपीठ टीम
गुगलने आज बाल दिवस म्हणून डूडल कलाकृती स्पर्धेतील विजोत्या डूडलची घोषणा केली. गुगलने या स्पर्धेची घोषणा काही वेळापूर्वीच केली होती. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आज १४ नोव्हेंबर रोजी या स्पर्धेच्या विजेत्याची घोषणा केली. या स्पर्धेची थीम कंपनीने “पुढील २५ वर्षांत भारत” अशी ठेवली होती. या स्पर्धेचा विजेता कोलकाताचा श्लोक मुखर्जी ठरला आहे.
कोलकाताचा श्लोक मुखर्जी डूडल फॉर गुगल २०२२ आर्टवर्क स्पर्धेचा मानकरी…
- श्लोक मुखर्जी हा कोलकातामध्ये राहणारा रहिवासी आहे.
- श्लोक मुखर्जी या स्पर्धेचा विजेता ठरला आहे.
- गुगलने प्लॅटफॉर्मवर डूडल बनवून विजेत्याची घोषणा केली.
- गुगलने डुडल बनवून श्लोकाची कलाकृती जगासमोर मांडली.
- या स्पर्धेची थीम “पुढील २५ वर्षांत भारत” असा होता.
- श्लोक मुखर्जी यांनी त्याच्या चित्रात वैज्ञानिक मानवतेच्या उन्नतीसाठी भारत पुढील २५ वर्षांत इको-फ्रेंडली रोबोटिक्स कसे विकसित करेल याचे चित्रण केले आहे.
- भारत आगामी काळात नियमितपणे अंतराळात जाणार असल्याचेही दाखवले आहे.
- एवढेच नाही तर येत्या काही वर्षात भारताने आयुर्वेदाच्या क्षेत्रात खूप प्रगती केली असेल हेही या चित्रात दिसते.
१,००,००० विद्यार्थ्यांचा सहभाग…
- गुगलने आयोजित केलेल्या या स्पर्धेत १०० हून अधिक शहरांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
- या स्पर्धेत एकूण १,४५० शाळांमधील सुमारे १,००,००० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
- या स्पर्धेत जे विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते ते सर्व इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी होते.
- या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गुगलने विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेची वेळ दिली होती.
- या विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत गुगलने त्यांना डूडल फॉर गुगल वेबसाइटवरही स्थान दिले.
- या साइटवर कंपनीने विद्यार्थ्यांनी बनवलेल्या डूडलशी संबंधित सर्व माहिती दिली आहे.
लिंक क्लिक करा आणि पाहा:
https://www.google.com/doodles/doodle-for-google-2022-india-winner