Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काय आहेत टॅक्स सेव्हिंग एफडी? कोणती बँक टॅक्स सेव्हिंग एफडीवर सर्वाधिक व्याज देते…

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Tax Saving FD

मुक्तपीठ टीम

टॅक्स सेव्हिंग एफडी हे बँक आणि एनबीएफसीद्वारे ऑफर केलेले एक आर्थिक गुंतवणूक साधन आहे जिथे तुम्ही पैसे जमा करू शकता आणि सामान्य बचत खात्यापेक्षा जास्त व्याज मिळवू शकता. नियमित एफडी जास्त परतावा देऊ शकते परंतु कर लाभ देत नाही. टॅक्स सेव्हिंग एफडीत पाच वर्षांची लॉक-इन कालावधी आहे. याचा अर्थ असा की एकदा गुंतवणूकदाराने एफडीमध्ये गुंतवणूक केली की, तो पाच वर्षांनीच त्याचे पैसे काढू शकतो. टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये गुंतवणूक केल्याने, आयकर कलम ८०सी अंतर्गत एका आर्थिक वर्षात १.५० लाख रुपयांपर्यंत सूट मिळते.

बँकेतील ठेवींवर मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक आधारावर व्याज घेऊ शकता. ‘टॅक्स सेव्हिंग एफडी’वर सर्वाधिक व्याज देणार्‍या पाच बँकांबद्दल जाणून घेवूया…

१. युनियन बँक ऑफ इंडिया

  • युनियन बँकेने एफडी व्याजदरात वाढ केली आहे.
  • २५ नोव्हेंबर रोजी लागू होणाऱ्या व्याजदरांनुसार, पाच वर्षांच्या कर बचत एफडीवर बँकेकडून ६.७० टक्के व्याज दिले जात आहे.
  • ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून ०.५० टक्के अतिरिक्त व्याज दिले जात आहे.

२. कॅनरा बँक

  • कॅनरा बँक पाच वर्षांच्या टॅक्स सेव्हिंग एफडीवर ६.५० टक्के व्याज देत आहे.
  • एफडी घेणारी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असल्यास, त्याला बँकेकडून ७.०० टक्के व्याज दिले जात आहे.

३. इंडियन ओव्हरसीज बँक

  • पाच वर्षांच्या टॅक्स सेव्हिंग एफडीवर बँक ६.४० टक्के व्याज देत आहे.
  • या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ६.९० टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.१५ टक्के व्याज दिले जात आहे.

४. इंडियन बँक

  • इंडियन बँकेने अलीकडेच एफडी व्याजदरात वाढ केली आहे.
  • सध्याच्या व्याजदरानुसार पाच वर्षांच्या करबचत एफडीवर ६.४० टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ६.९० टक्के व्याज दिले जात आहे.

५. बँक ऑफ इंडिया

  • बँक ऑफ इंडिया बँकेने या महिन्यातच नवीन व्याजदर लागू केले आहेत.
  • पाच वर्षांच्या टॅक्स सेव्हिंग एफडीवर बँक ६.२५ टक्के व्याज देत आहे.
  • ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त ०.५० टक्के व्याज दिले जात आहे.

टॅक्स सेव्हिंग एफडी कशी काम करते?

  • ही बँका आणि NBFCs द्वारे ऑफर केलेली आर्थिक तरतूद आहे.
  • एका निश्चित कालावधीसाठी किंवा कार्यकाळासाठी एकरकमी पैसे जमा करा.
  • टॅक्स सेव्हिंग फिक्स डिपॉझिटचा कालावधी ५ वर्षांचा असतो.
  • हे आयकर कायदा, १९६१ च्या कलम ८०सी अंतर्गत कर सवलत देते.
  • यात लॉक-इन कालावधी आहे.
  • मुदतीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी नाही.
  • ठेवींवर मिळणारे व्याज करपात्र असते.
  • टॅक्स सेव्हिंग एफडीच्या मॅच्युरिटीच्या वेळी, मॅच्युरिटीची रक्कम एफडीशी संबंधित बचत खात्यात जमा केली जाते.

Tags: good newsmuktpeethTax Saving FDTax Saving FD Interestuseful newsउपयोगी बातमीचांगली बातमीटॅक्स सेव्हिंग एफडीटॅक्स सेव्हिंग एफडी व्याजमुक्तपीठ
Previous Post

हिवाळ्याच्या मोसमात हनिमून डेस्टिनेशनचा विचार? ‘या’ ठिकांणांची माहिती आणि खर्च जाणून घ्या, नक्की भेट द्या

Next Post

आता Hero Harleyच्या नवीन Royal Enfieldबाईकची बाजारात होणार धडाकेबाज एन्ट्री!

Next Post
Harley Davidson

आता Hero Harleyच्या नवीन Royal Enfieldबाईकची बाजारात होणार धडाकेबाज एन्ट्री!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!