मुक्तपीठ टीम
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केलेले आधारकार्ड हे ओळख आणि निवासाचा अधिकृत पुरावा म्हणून काम करते. सध्या आधार कार्ड हेच ओळखपत्र म्हणून कायम आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्या कार्डमध्ये नाव, पत्ता किंवा मोबाईल नंबर बरोबर लिहिलेला नसेल किंवा लग्नानंतर आधार कार्डमध्ये तुमचे नाव, आडनाव आणि पत्ता बदलायचा असेल तर जाणून घ्या हे सोपे मार्ग …
लग्नानंतर आधार कार्डवर ऑनलाइन नाव कसे बदलावे
लग्नानंतर जर तुम्हाला तुमचे नाव बदलायचे असेल, तर तुम्ही ते सहजपणे ऑनलाइन आणि ऑफलाइन देखील करू शकता.
- सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाईट https://ask.uidai.gov.in/ ला भेट द्या
- मग मोबाईल नंबर आणि कॅप्चाच्या मदतीने लॉग इन करा.
- यानंतर, विचारलेले तपशील क्रमाने भरा.
- आपले नाव आणि आडनाव प्रविष्ट करा.
- स्कॅन केलेले स्व-प्रमाणित समर्थन कागदपत्र अधिकृत वेबसाईटवर अपलोड करा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. दिलेल्या बॉक्समध्ये भरा.
- सेल्फ सर्व्हिस वेबसाईटद्वारे लग्नानंतर नाव बदलण्यासाठी UIDAI कोणतेही शुल्क आकारत नाही.
लग्नानंतर आधार कार्डमध्ये ऑफलाइन नाव कसे बदलावे
- सर्वप्रथम जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्या.
- सगळ्या कागदपत्रांच्या मूळ प्रती केंद्रात घेऊन जाव्या लागतील
- ऑफलाइन नाव बदलण्याच्या प्रक्रियेसाठी, तुम्हाला ५० रुपये शुल्क भरावे लागेल.
- तुमचे नाव नंतर अपडेट केले जाईल.
आधार कार्डमध्ये नाव अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- लग्नानंतर आधार कार्डमध्ये नाव बदलण्यासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला लग्नाच प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- प्रमाणपत्रात जोडप्याचा पत्ता असणे बंधनकारक आहे.