मुक्तपीठ टीम
भारतीय रिझर्व्ह बँकने अधिकृतपणे डिजिटल रुपी नावाचे पहिले डिजिटल टोकन लाँच केले आहे. डिजिटल रुपया (e₹-R) आजपासून मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू आणि भुवनेश्वर येथे खरेदी आणि व्यवसायासाठी उपलब्ध झाला आहे.
हळूहळू इतर शहरांनाही eRs-R च्या कक्षेत आणले जाईल. आरबीआयद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँकद्वारे डिजिटल रुपया खरेदी केला जाऊ शकतो. येत्या काही दिवसांत डिजिटल रुपयाची उपलब्धता अहमदाबाद, लखनऊ, हैदराबाद, इंदोर, गंगटोक, गुवाहाटी, कोची, पटना आणि शिमला येथे विस्तारली जाईल, जेणेकरून अधिक वापरकर्ते ते खरेदी करू शकतील.
डिजिटल रुपया कसा आणि कुठे खरेदी करायचा?
- डिजिटल रुपया आता चार प्रमुख बँकांच्या अधिकृत अॅप किंवा वेबसाइटवरून खरेदी करता येईल.
- स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँकद्वारे डिजिटल रुपया खरेदी केला जाऊ शकतो.
- या बँका त्यांच्या विद्यमान अॅप्सवरून डिजिटल रूपये खरेदी करण्यास परवानगी देतील किंवा डिजिटल रूपयांची खरेदी आणि हाताळणी करण्यासाठी नवीन अॅप जारी करतील.
- डिजिटल पैशासाठी कोणत्याही बँक खात्याची आवश्यकता नाही.
एखाद्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला डिजिटल रुपया पाठवता येईल का?
- होय, पैसे पाठवणे आणि क्रिप्टोकरन्सी पाठवणे याप्रमाणेच ते एखाद्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला देखील पाठवले जाऊ शकते.
- पेटीएम वॉलेटमध्ये जसे पैसे साठवता त्याच पद्धतीने डिजिटल रूपे साठवले जाऊ शकतात.
- सर्व प्रकारच्या व्यवहारांसाठी वापरले जाऊ शकतात.
डिजिटल रुपया ही क्रिप्टोकरन्सी आहे का?
- डिजिटल रुपया हा क्रिप्टोकरन्सीपेक्षा वेगळा आहे.
- क्रिप्टोकरन्सीला भारतात मान्यता नाही आहे.
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे स्वतः जारी केल्या जातील आणि RBI स्वतः रिडीम करतील.
- क्रिप्टोकरन्सीमध्ये फसवणूक होण्याची अधिक शक्यता असते, परंतु डिजिटल रुपया पूर्णपणे सुरक्षित असेल.