Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सीमेवर पाळत ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या ५ हजार ५०० कॅमेऱ्यांची फौज!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
BSF

मुक्तपीठ टीम

सीमा सुरक्षा दल हे सर्वात मोठे निमलष्करी दल आहे. १ डिसेंबर रोजी सीमा सुरक्षा दलाला स्थापन हेऊन ५८ वर्षे पूर्ण झाली आहेत. सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSFवर ६३८६.३६ किमी लांबीच्या सीमेची जबाबदारी आहे. त्यातील २२८९.६६ किमी लांबीची सीमा पाकिस्तानला लागून आहे. बांगलादेशला लागून ४०९६.७० किमी लांबीची सीमा आहे. BSFच्या १९३ बटालियन आहेत. आता या सीमांवर लक्ष ठेवण्यासाठी BSF ५ हजार ५०० कॅमेऱ्यांची फौज सज्ज करत आहे.

पाकिस्तान आणि बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर दक्षता वाढवण्यासाठी आणि घुसखोरीच्या कारवायांवर नजर ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल यावर्षी ५,५०० कॅमेरे बसवणार आहे. याशिवाय पेन टिल्ट झूम कॅमेरा आणि आयआरआयडीएस सारख्या परवडणाऱ्या उपकरणांच्या मदतीने पाळत ठेवणे अधिक मजबूत केले जाईल.

कॅमेरे बसवण्यासाठी ३० कोटींचा निधी!

  • सीसूब महासंचालक पंकज कुमार सिंह यांनी बीएसएफच्या स्थापना दिन वार्षिक पत्रकार परिषदेत सांगितले की केंद्र सरकारने नुकतेच कॅमेरे बसवण्यासाठी ३० कोटी रुपये जारी केले आहेत.
  • या इंटर-लिंक्ड कॅमेऱ्यांच्या मदतीने सीमेपलीकडून होणार्‍या कोणत्याही घुसखोरीवर आणि अनुचित कारवायांवर नजर ठेवली जाऊ शकते.
  • या प्रकल्पात राजस्थान, पंजाब आणि जम्मू काश्मीरसह सात सीमांच्या ४८४ किलोमीटर लांबीच्या सीमेवरील ६३५ दुर्गम ठिकाणांचा समावेश केला जाईल.
  • देशाच्या सीमा सुरक्षित असून त्या अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने काम केले जात आहे.
  • तंत्रज्ञानाच्या विकासाच्या युगात घुसखोरी आणि इतर घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचीही मदत घेतली जात आहे.
  • सीमावर्ती भागात १०० ड्रोन तैनात करण्यात आले आहेत.
  • आणखी अनेक ड्रोन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
  • ५४६ लांब श्रेणीचे एचटीआय देखील डिसेंबरपर्यंत पोहोचतील.
  • दक्षता वाढण्यासही मदत होईल.

बांगलादेश सीमेच्या तस्करीत वाढ!

  • पश्चिम आघाडीवर तस्करीच्या घटनांमध्ये घट झाली आहे.
  • बांगलादेशला लागून असलेल्या पूर्व सीमेवर अधिक हालचालींमुळे अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे.
  • दारूऐवजी वापरण्यात येणारे बंदी असलेले सरबत फेन्सीडील व इतर नशेच्या गोळ्या तस्कर पाठवत आहेत.
  • ३१ ऑक्टोबरपर्यंत पश्चिम सीमेवर ५१८.२७२ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
  • पूर्व सीमेवर ही संख्या २५,९५१.६७१ किलो होती.
  • घुसखोरीही पूर्व सीमेवर अधिक होती.
  • पश्चिम सीमेवर १८२ तर पूर्व सीमेवर ३९९२ जणांना अटक करण्यात आली.
  • हे रोखण्यासाठी बांगलादेशवर घुसखोरी अलार्म यंत्रणा बसवण्यात आली आहे.

परेडमध्ये उंटावर महिला प्रथमच!

  • रॅगिंग डे परेडनंतर जानेवारीमध्ये होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रथमच महिला उंटांच्या ताफ्यात दिसणार आहेत.
  • गेल्या वर्षी जैसलमेर नंतर, यावेळी ४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता अमृतसर येथील गुरु नानक देव विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रायझिंग डे परेड होणार आहे.
  • यामध्ये प्रथमच बीएसएफच्या एअर डायव्हिंग टीमची कामगिरी हे मुख्य आकर्षण असेल.
  • गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हे प्रमुख पाहुणे असतील.

Tags: bsfBSF INDIABSF RaisingDayसीमा सुरक्षा दलसीमा सुरक्षा दलाला स्थापन दिन
Previous Post

MG Motor India Reports Retail Sales of 4079 units in November 2022

Next Post

आरबीआयचा डिजिटल रुपया! जाणून घ्या कसा खरेदी करायचा आणि वापरायचा…

Next Post
RBI

आरबीआयचा डिजिटल रुपया! जाणून घ्या कसा खरेदी करायचा आणि वापरायचा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!