मुक्तपीठ टीम
बर्याच ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतर पैसे मिळतात पण पैसे कुठे गुंतवायचे, त्यांना चांगला परतावा कोठे मिळेल हे त्यांना माहिती नसते तर, प्रधानमंत्री वय वंदना ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुमचे मूळ पैसे सुरक्षित राहतात आणि नियमित अंतराने परतावा देखील मिळतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या सरकारी योजनेंतर्गत पती-पत्नी दोघेही वयाच्या ६० नंतर मिळून प्रत्येक महिन्याला १८,५०० रुपये पेंशनचा हमी लाभ घेऊ शकतात. तर,१० वर्षांनंतर संपूर्ण गुंतवणूक देखील परत केली जाईल. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घ्या-
प्रधानमंत्री वय वंदना योजना नेमकी आहे तरी काय?
- प्रधानमंत्री वय वंदना योजना सामाजिक सुरक्षा योजना आणि पेंशन योजना आहे.
- हे भारत सरकारने सादर केले आहे परंतु ते भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) द्वारे चालवले जाते.
- या योजनेंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना इतर योजनांच्या तुलनेत गुंतवणुकीवर अधिक व्याज मिळतो.
- या योजनेत ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक मासिक किंवा वार्षिक पेंशन योजना निवडू शकतात.
- या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा रु. १५ लाख आहे.
किती मिळेल पेंशन? अर्ज कुठे करायचा?
- प्रधानमंत्री वय वंदना योजनेअंतर्गत मासिक पेंशन योजनेवर १० वर्षांसाठी ८ टक्के व्याज मिळेल.
- वार्षिक पेंशन निवडल्यास १० वर्षांसाठी ८.३ टक्के व्याज मिळेल.
- या सरकारी योजनेत ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.
- एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.
- पेंशनचा पहिला हप्ता १ वर्ष, ६ महिने, ३ महिने किंवा पॉलिसीधारकाने रक्कम जमा केल्यानंतर एक महिन्यानंतर उपलब्ध होईल.
- गुंतवणुकीवर अवलंबून, दरमहा १००० ते ९२५० रुपये पेंशन उपलब्ध आहे.
- या योजनेत ३१ मार्च २०२३ पर्यंत गुंतवणूक करता येईल.