Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भविष्य निर्वाह निधी योजना: जाणून घ्या सर्वकाही…

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
EPFO

मुक्तपीठ टीम

भविष्य निर्वाह निधी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी बातमी आहे. भारतातील पगारदार व्यक्तींसाठी ही सर्वात फायदेशीर आणि लोकप्रिय गुंतवणूक आहे. भविष्य निर्वाह निधी संघटना ही भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली वैधानिक संस्था आहे. या योजनांतर्गत नियमित गुंतवणूक केली जाते. या गुंतवणुकीतून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मोठी रक्कम मिळते. परंतु, भविष्य निर्वाह निधी योजना ही केवळ एकच नसून तिचे आणखी प्रकार आहेत.

भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन आणि विमा यासंबंधीचे फायदे याद्वारे मिळातात. या योजनेचे ३ प्रकार आहेत. पहिला म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफ, दुसरा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ आणि तिसरा सामान्य भविष्य निर्वाह निधी म्हणजेच जीपीएफ यांचा समावेश होतो.

भविष्य निर्वाह निधी योजनेतील ‘या’ ३ योजनांविषयी सविस्तर माहिती

१. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ)

  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही एक सरकारी संस्था आहे जी भारतामध्ये राज्य-प्रोत्साहित पेन्शन आणि विमा योजना प्रदान करते.
  • सदस्य आणि आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात ही जगातील सर्वात मोठी संस्था आहे.
  • ईपीएफ ही सरकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त पगारदार लोकांसाठी भविष्य निर्वाह निधी योजना आहे.
  • ईपीएफओच्या सध्याच्या नियमांनुसार, कर्मचारी दरमहा मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या १२ टक्के योगदान देतो. ही रक्कम त्यांच्या पगारातून दरमहा कापली जाते.
  • तसेच तो ज्या संस्थेत काम करतो. ती तेवढीच रक्कम कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यातही जमा करते.

२. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ)

  • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हा करमुक्त बचत मार्ग आहे. ज्याला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे.
  • भारतीयांमध्ये बचतीची सवय लावण्यासाठी आणि खासगी क्षेत्रात काम करणार्‍या लोकांना सेवानिवृत्ती सुरक्षा प्रदान करण्यासाठी पीपीएफची सुरुवात वित्त मंत्रालयाने केली.
  • पीपीएफ ही स्वयंसेवी भविष्य निर्वाह निधी योजना आहे. . कोणताही भारतीय नागरिक हे खाते उघडू शकतो.
  • खात्यात किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १ लाख ५० हजार रुपये जमा केले जाऊ शकतात.
  • हे खाते १५ वर्षांच्या कालावधीसाठी आहे. ते पाच वर्षांसाठी वाढवता येऊ शकते.
  • पीपीएफ खाते उघडल्याच्या सातव्या आर्थिक वर्षापासून दरवर्षी आंशिक पैसे काढता येतात.

३. सामान्य भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ)

  • सामान्य भविष्य निर्वाह निधी योजना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे.
  • सर्व कायमस्वरूपी कर्मचारी आणि पुनर्रोजगार पेन्शनधारक जीपीएफ खाते उघडू शकतात.
  • या योजनेअंतर्गत मासिक पगाराच्या किमान ६ टक्के रक्कम जीपीएफ खात्यात जमा करावी लागेल.

Tags: Employees Provident FundGeneral Provident Fundgood newsmuktpeethProvident Fund SchemePublic Provident Funduseful newsउपयोगी बातमीकर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनाचांगली बातमीभविष्य निर्वाह निधी योजनामुक्तपीठसामान्य भविष्य निर्वाह निधीसार्वजनिक भविष्य निर्वाह निधी
Previous Post

महाराष्ट्राला ‘टीआयओएल’चा जुरी पुरस्कार प्रदान

Next Post

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये ट्रेड अॅप्रेंटिसशिपसाठी १ हजार २१६ जागांसाठी संधी

Next Post
Western Coalfield Limited

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये ट्रेड अॅप्रेंटिसशिपसाठी १ हजार २१६ जागांसाठी संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!