Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘ईव्हीएम’बाबत ठाऊक आहे का? जाणून घ्या सर्वकाही…

September 5, 2026
in उपयोगी बातम्या
0
Electronic Voting Machine

मुक्तपीठ टीम

निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखांची घोषणा करताच ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनची चर्चा सुरू होते. निवडणुकींद्वारे अनेक उमेदवारांचे भवितव्य जनता ईव्हीएमच्या माध्यमातून ठरवते. सात चरणांत होणाऱ्या मतदान प्रक्रियेत मतदार ईव्हीएमद्वारे हजारो उमेदवारांच्या भविष्याचा निर्णय घेतात. नुकत्याच हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. गुजरातमध्येही निवडणुका होणार आहेत, ज्यांच्या तारखा निवडणूक आयोग दिवाळीनंतर जाहीर करू शकते.

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजे काय?

  • ‘ईव्हीएम’ अर्थातच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन.
  • या मशीनमध्ये दोन प्रकारचे युनिट्स आहेत. यात कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट असते.
  • मतदार मतदानासाठी जातात तेव्हा मतदान केंद्रावर उपस्थित असलेले निवडणूक अधिकारी कंट्रोल युनिटद्वारे बॅलेट युनिट चालू करतात. त्यानंतरच मत घेतले जाते.
  • या युनिटमध्ये उमेदवारांची नावे लिहिली जातात, त्यापैकी मतदार आपल्या आवडत्या उमेदवाराची निवड करतो.
  • ‘ईव्हीएम’चे मुख्यत्वे बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्होटर व्हेरिफाइबल पेपर ऑडिट ट्रेल मशीन (VVPAT) असे तीन भाग असतात.
  • मतदान अधिक पारदर्शी करण्यासाठी २०१० नंतर ‘व्होटर व्हेरिफाइबल पेपर ऑडिट ट्रेल मशीन’चा वापर करण्यास सुरूवात झाली आहे.

ईव्हीएम मशीन कोणी बनवली?

  • भारतात ईव्हीएम बनवण्याचे श्रेय सरकारी मालकीच्या इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांना जाते.
  • या दोन्ही कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन विकसित आणि चाचणी केली. त्यानंतर त्याचा वापर निवडणुकीत होऊ लागला.
  • आजही या कंपन्यांकडून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आणि इतर संबंधित उपकरणे तयार केली जातात.
  • ईव्हीएमचा वापर मतदान आणि मतमोजणीसाठी केला जातो.
  • केरळच्या उत्तर परावूर विधानसभा मतदारसंघात १९८९ मध्ये भारतात पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर करण्यात आला.

ईव्हीएममध्ये डेटा किती दिवस साठवला जातो?

  • इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बॅटरीवर काम करते. त्यामुळे लाईट गेल्यावरही मतदानाची प्रक्रिया सुरू असते.
  • यासोबतच या मशीनबाबत हेही आश्वासन देण्यात आले आहे की, त्याचे निळे बटण दाबताना किंवा ईव्हीएम चालवताना कोणालाही विजेचा शॉक लागण्याचा धोका नाही.
  • ईव्हीएममध्ये, डेटा क्लिअर होईपर्यंत कंट्रोल युनिट त्याच्या मेमरीमध्ये निकाल सेव्ह करू शकते.
  • ईव्हीएममध्ये बॅटरी असते. त्यामुळे वीज नसल्यास मतदान प्रक्रिया खंडित होत नाही. ईव्हीएममुळे कधीही शॉक बसण्याचा धोका नाही. ईव्हीएम मशीनची रचना सर्व बाबींचा विचार करुन केलेली असते.

Tags: election commissionElectronic Voting MachineEVMmuktpeethuseful newsइलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनईव्हीएमउपयोगी बातमीनिवडणूक आयोगमुक्तपीठ
Previous Post

“रुपया कमजोर नाही, डॉलर मजबूत होतोय!” अमेरिकेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा दावा!!

Next Post

“अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करा” राज ठाकरेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र!

Next Post
Raj Thackeray Letter to Devendra fadnavis

"अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करा" राज ठाकरेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!