मुक्तपीठ टीम
दिवाळीनंतरचा काळ हा लग्नसराईचा असतो. एकदा तुळशीचं लग्न झालं की, लगीनघाई सुरू होते. आता नुकतीच दिवाळी झाली. लग्नांची आमंत्रणं येऊ लागली. अशी वेळी, हनिमून डेस्टिनेशनचा विचार करत असलेल्या जोडप्यांसाठी ही उपयुक्त माहिती आहे.
या हिवाळ्याच्या मोसमात देश-विदेशातील असे बरेच ठिकाणं आहेत जे हनिमून डेस्टिनेशनसाठी उत्तम पर्याय ठरतील. सध्या तरी, परदेशात हनिमूनला जाण्याची इच्छा असलेल्या जोडप्यांची पहिली पसंती ही बाली, मालदीव आणि थायलंड आहे. तर दुसरीकडे भारतातच जाण्याचा विचार करत असलेल्यांची पसंती ही, शिमला, मनाली, काश्मीर, अंदमान, गोवा आणि केरळला दिली जात आहे.
पदेशातील हनिमून डेस्टिनेशनचा विचार करणाऱ्यांनी ‘ही’ माहिती जाणून घ्या…
१. मालदीव आणि बाली
- मालदीवमध्ये अनेक प्रकारचे समुद्रकिनारे आहेत, जिथे जोडपे मनमोकळेपणाने एन्जॉय करू शकतात.
- येथे खासगी समुद्रकिनारा आणि खासगी स्वीमिंग पूलचीही सोय आहे. तिथलं वातावरणही खूप चांगलं आहे.
- येथे लोक खासगी व्हिलामध्ये राहतात. त्याच वेळी, बाली हे हनिमूनला जाण्यासाठी एक सुंदर ठिकाण आहे.
- येथील ऐतिहासिक भागही जोडप्यांना आकर्षित करतात.
- येथे दोन-तीन चांगली शहरे आहेत, जिथे जोडप्यांना त्यांच्या जोडीदारासोबत हँग आउट करायला आवडते.
२. थायलंड
- थायलंडची राजधानी बँकॉक आणि पट्टाया येथे फिरण्यासाठी चांगली ठिकाणे आहेत.
- थायलंड हे जोडप्यांसाठी स्वस्त ठिकाणांपैकी एक आहे.
- तसेच, नवीन जोडप्यांना येथे जायला आवडते.
- थायलंडचा अरोमा स्पा आणि फिश स्पाला लोक अधिक पसंती दर्शवतात.
भारतात हनिमून डेस्टिनेशनसाठी असणारे फर्स्ट क्लास ठिकाणे!
- शिमला आणि मनालीमध्ये स्नो फॉलचा जबरदस्त अनुभव घेता येतो.
- नवीन विवाहित जोडपे हिवाळ्यात शिमला, मनाली आणि काश्मीरमध्ये हनिमून साजरा करण्यास प्राधान्य देतात.
- इथल्या सुंदर दऱ्यां-खोऱ्यांमध्ये सुंदर निसर्गमय दृश्य पाहण्यासारखे असते.
- थंड वातावरणात दाल लेकमधील हाउसबोटचा आनंद घेता येतो.
- याशिवाय केरळ, गोवा आणि अंदमानमध्येही लोक हनिमून साजरा करण्यास प्राधान्य देत आहेत.
- केरळचा शांत समुद्रकिनारा आणि घरोघरी एक रात्र निसर्गासोबत घालवण्याचा आनंद काही वेगळाच आहे.
भारतासह विदेशातील डेस्टिनेशनच्या पॅकेजविषयी सविस्तर…
- बाली- पंचतारांकित हॉटेलमध्ये सहा रात्रींसाठी प्रति व्यक्ती खर्च हा ९९ हजार ९९९ असेल.
- मालदीव- पंचतारांकित हॉटेलमध्ये चार रात्रीसाठी प्रति व्यक्ती खर्च ९९ हजार ९९९ असेल.
- अंदमान- चार तारांकित हॉटेलमध्ये ४ रात्रीसाठी प्रति व्यक्ती खर्च ३९ हजार ९९९ असेल.
- थायलंड- चार तारांकित हॉटेलमध्ये चार रात्रीसाठी प्रति व्यक्ती ४० हजार खर्च असेल.
- शिमला आणि मनाली- चार तारांकित हॉटेलमध्ये चार रात्रीसाठी २० हजार खर्च असेल.
- काश्मीर- चार तारांकित हॉटेलमध्ये चार रात्रीसाठी प्रति व्यक्ती ४९,९९९ खर्च असेल.
- केरळ- चार तारांकित हॉटेलमध्ये चार रात्रीसाठी प्रति व्यक्ती खर्च ३९,००० असेल.
- गोवा- चार तारांकित हॉटेलमध्ये चार रात्रींसाठी प्रति व्यक्ती २५,००० खर्च असेल.