मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी निंबाळकर यांच्या नियुक्तीची माहिती पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. ही नियुक्ती निंबाळकर यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६ वर्षासाठी किंवा वयाची ६२ वर्षे वय होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी श्री. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर, भाप्रसे (निवृत्त) यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली असून नवनियुक्त मा. अध्यक्षांनी आज दिनांक 26 नोव्हेंबर, 2021 रोजी पदभार स्वीकारला आहे. pic.twitter.com/jNJ9PAj9Nv
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) November 26, 2021
निंबाळकर हे प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी
- गेल्या अनेक दिवसांपासून एमपीएसी आयोगाचा पूर्ववेळ अध्यक्ष नव्हता.
- आयोगावर पूर्णेवेळ अध्यक्ष देण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून केली जात होती.
- त्यानंतर आता राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
- निंबाळकर यांचा कार्यकाळ यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६ वर्षासाठी किंवा वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील.
- अधिसूचनेत तसे नमूद करण्यात आले आहे.
- किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर हे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत.
निंबाळकर हे पुर्णवेळ अध्यक्ष
- दरम्यान, याआधी सतीश गवई हे आोयाचे पूर्णवेळ अध्यक्ष होते.
- ते ऑगस्टमध्ये निवृत्त झाले.
- त्यांतर नंतर हे पद दयानंद मेश्नाम यांच्याकडे देण्यात आलं.
- ते निवृत्त झाल्यानंतर आता पुर्णवेळ अध्यक्ष म्हणून किशोर राजे निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे.
- सध्या आयोगात एक अध्यक्ष आणि तीन सदस्य आहेत.