मुक्तपीठ टीम
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिवाळीनंतर राज्यातील तीन मंत्री आणि तीन जावई यांचे घोटाळे बाहेर काढणार असं रविवारी ट्वीट केलं होत. मात्र सोमवारी सकाळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा पवार कुटुंबावर आरोप केले आहेत.
अजित पवारांचा चोरीचा माल परिवाराच्या खात्यात वर्ग
- अजित पवारांच्या कंपनीत अनेक बिल्डरांकडून पैसे आले ते परत दिले गेले नाहीत.
- ठाकरे पवारांचं हेच वैशिष्ठ्य आहे.
- संजय राऊतांच्या खात्यात लाखो कोटी रुपये आले ते परत दिलेच नाहीत.
- ईडीची नोटीस आल्यावर संजय राऊतांनी पैसे परत दिले.
- अजित पवारांच्या खात्यात शेकडो कोटी रुपये आले ते पैसे अजित पवारांनी जावयाच्या, बायकोच्या खात्यात बहिणीच्या खात्यात आणि आईच्या खात्यात वर्ग केले.
- अजित पवारांनी चोरीचा माल पूर्ण परिवाराच्या खात्यात पैसे वर्ग केले.
लक्ष विचलीत व्हावं म्हणून नवाब मलिक यांना पुढे केलं जातेय
- इन्कम टॅक्सनंतर ईडीच्या धाडी पडल्या.
- १९ दिवस या धाडी सुरु आहेत.
- एक हजार कोटीपेक्षा अधिक संपत्ती समोर आली आहे.
- शेल कंपन्यांमधून पैसे आले आहेत.
- शरद पवारांना असं वाटत का पाच पंधरा लेअर तयार केल्यामुळं ब्लॅक मनी समोर येणार आला नाही.
- इन्कम टॅक्स आणि ईडीच्या धाडी बाहेर पडू नये म्हणून नवाब मलिकांना पुढं करण्यात आलं आहे.
नवाब मलिकांची पेड पब्लिसिटी
- मलिक साहेब, समीर वानखेडे पहिल्या लग्नापूर्वी पोलिसात नोकरी लागले होते.
- नवाब मलिक तुम्ही ते यूपीएससीतून अधिकारी झाले तेव्हा का गप्प बसला होता.
- नवाब मलिकांची पेड पब्लिसिटी सुरु केलीय.
- नवाब मलिक आता देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल बोलत आहेत.
- अजित पवार आणि पवार कुटुंबाच्या जावयांच्या कंपन्यात एक हजार पन्नास कोटी रुपये कोठून आले याचं उत्तर द्यावं.
- शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं.
मलिकांच्या ट्विटमुळं मला आजचं पहिला फटाका फोडावा लागला
- गेल्या चार महिन्यांपासून मी आणि आमच्या टीमकडून अभ्यास सुरु होता.
- आयटी आणि ईडीच्या धाडीतून ते स्पष्ट झालंय.
- जरंडेश्वरच्या शेतकऱ्यांनी पुरावे दिले आहेत त्यातून ते स्पष्ट झालंय.
- नवाब मलिकांना दाऊद नाव हे खूप ओळखीचं आहे.
- उद्धव ठाकरेंचे वडील बाळासाहेब ठाकरे यांची १९९२ ते १९९५ भाषणं ऐकली असती तर नवाब मलिकांना दाऊद आणि शरद पवारांचा काय संबंध आहे हे कळलं असंत.
- माझ्यावर दहा हजार कोटींचा दावा केला तरी मी माझ्या आरोपावर ठाम आहे.
- दोन बिल्डरांकडे १८० कोटी रुपयांची संपत्ती आढळली.
- बिल्डरांकडून आलेले पैसे अजित पवारांच्या नातेवाईकांच्या खात्यात पैसे वर्ग केले गेले आणि पवारांचा साम्राज्य उभं राहिलं.
- समीर वानखेडे आणि अमृता फडणवीस इतकं गलिच्छ राजकारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच करु शकतात.
- नवाब मलिकांच्या ट्विटमुळं मला आजचं पहिला फटाका फोडावा लागला.