मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय ड्रामाचे पडसाद आज दिल्लीत उमटले. शनिवारी रात्री सोमय्यांवर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते किरीट सोमय्या आणि भाजपाचे शिष्टमंडळ यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील परिस्थितीबाबत गृहसचिवांनी चिंता व्यक्त केली. तसेच सोमय्या यांनी याप्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्यात स्पेशल टीम पाठविण्याची मागणी केली.
पोलिस महासंचालक संजय पांडेंवर गंभीर आरोप…
- किरीट सोमय्या राज्य भाजपाच्या शिष्टमंडळांसोबत गृहसचिंवांच्या सोमवारी भेटीला गेले होते.
- पोलिसांच्या हजेरीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे गुंड मारहाण करतात,
- ठाकरेंच्या गुंडानी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला तसेच पोलिस महासंचालक संजय पांडेंनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज गायब केले.
त्यांची खात्यांतर्गत चौकशी करा. - खार रोड पोलीस स्टेशन येथे जो माझ्यावर हल्ला झाला, तो ठाकरे सरकारनं स्पॉन्सर्ड केलेला हल्ला होता.
- पोलिसांना मी हल्ला होणार असल्याचं सांगितल्यावर त्यांनी व्यक्तिगत जबाबदारी घेतली आणि पोलीस स्थानकाचं दार उघडताच, बाहेर असलेल्या ७०-८० गुंडांच्या माझ्या गाड्यांना हवाली करण्याचं पाप उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी केलं असल्याचा हल्लाबोलही सोमय्यांनी केला होता.
- माझा मनसुख हिरेन करायचा असं नियोजन संजय पांडे आणि उद्धव ठाकरेंनी केला.
- हा हल्ला उद्धव ठाकरेंच्या आदेशानं संजय पांडेंनी घडवून आणला.
राज्यात स्पेशल टीम पाठविण्याची मागणी…
- या प्रकरणी गृहसचिवांकडून चिंता व्यक्त करण्यात आलीय.
- दोन दिवसात केंद्रीय गृहमंत्रालय गंभीर दखल घेणार असल्याचे सोमय्या म्हणाले.
- याबाबत गृहसचिंवांसोबत २० मिनिटे चर्चा झाली.
- त्यावेळी गृहसचिवांना हल्ला प्रकरणाची उदाहरणं दिली, याप्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्यात स्पेशल टीम पाठविण्याची मागणीही यावेळी गृहसचिवांकडे सोमय्यांनी केलीय. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांचा माफिया म्हणून उपयोग सुरु केला आहे.
- महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेत्यांवर पोलिस स्टेशनच्या आवारात हल्ला केला जातो.
- या सर्वांची चौकशी केली जावी अशी आमची मागणी आहे.
- या शिष्टमंडळात सोमय्यांसह आमदार सुनील राणे, आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, पराग शाह, भाजपा मनपा नेते विनोद मिश्रा यांचा समावेश आहे.