मु्क्तपीठ टीम
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर सध्या शिवसेना खासदार संजय राऊत असल्याचे दिसत आहे. सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत मित्र परिवाराने १०० कोटींचा जम्बो कोरोना सेंटर घोटाळा केला असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.या जम्बो कोरोना सेंटर घोटाळ्याची ‘ईडी’कडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली. मात्र सोमय्यांच्या या आरोपांवर संजय राऊत यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
काय म्हणाले किरीट सोमय्या?
- दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलंड येथील कोविड सेंटर्सचं कंत्राट संजय राऊत यांचे भागीदार असलेले सुजीत पाटकर यांनी मिळवलं असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
- संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर यांनी आता १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला आहे.
- मुंबईत लाईफलाइन हेल्थ केअर जी कंपनी अस्तित्वात नाही, पेपर कंपनी. त्याला महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी NSCI, मुलुंड, दहिसर आणि पुणे येथील कोरोना सेंटर्सचे कंत्राट ठाकरे सरकारने दिले.
- या ठिकाणी अनेक कोरोनाबाधित रूग्णांचे मृत्यू झाले. या घोटाळ्यात ८० कोटी रुपये महापालिकेने पेमेंट केलं, २० कोटींचं दुसरे करत आहे.
- या संदर्भात नॅशनल डिझायस्टर मॅनेजमेंट ऑथरिटीचे चेअरमन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे.
या घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी.
संजय राऊतांचं प्रत्युत्तर
- माणसाने एकदा शेण खायचं ठरवलं तर शेणं खायचं स्वत: आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा.
- गुन्हे किती हवे ते केंद्र सरकारकडून ईडीकडून दाखल करु द्या.
- ईडीचे लोकं येतात आमच्या लोकांना पकडतात.
- आमच्याविरोधात खोटे स्टेटमेंट घेत आहेत.
- मला माहित आहे सर्व, दबाव टाकू, जेलमध्ये टाकू. अनिल परबांविरोधात हे स्टेटमेंट द्या, संजय राऊतांविरोधात हे स्टेटमेंड द्या. हे चालू आहे त्यांचे.
- कोण आहेत किरीट सोमय्या ते, मुळात किरीट सोमय्या कोण ज्यांच्यासाठी आम्ही उत्तर द्यावे आणि अमूक करावे.
- गुन्हा दाखल करायचा तर करा, मी काय घाबरतो.
- गुन्हे दाखल करा, खटले चालवा, हे काय आत्ता आहे का, दंगलीच्या काळापासून माझ्याविरोधात खटले चालू आहेत.
- हे जेव्हा शेपट्या घालून बसले होते बाबरीच्या काळात तेव्हापासून आमच्यावर खटले चालू आहेत ते अजून सुरु आहेत.
मला चिंता नाही