Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“वाइन दारू नाही असे संजय राऊत का म्हणतात?” किरीट सोमय्यांचा सरकारी निर्णयाआधी राऊतांवर वाइन भागिदारीचा आरोप

सोमय्यांनी तारखांनुसार मांडला घटनाक्रम...१६ एप्रिल २०२१ भागिदारी, १२ जानेवारी २०२२ वाइन व्यवसायात प्रवेश आणि २७ जानेवारी २०२२ वाइन विक्रीचा सरकारी निर्णय!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Kirit Somaiya Sanjay Raut 30-1-22

मुक्तपीठ टीम

वाइन ही काही दारू नसते, असे म्हटल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेना नेते संजय राऊतांवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी घणाघाती आरोप केले आहेत. महाराष्ट्र सरकारने वाइन ही किराणा दुकानांमध्येही सहजरीत्या विकण्याचा निर्णय घेण्याच्या काही महिन्यांआधी संजय राऊतांच्या मुलींनी वाइन डिस्ट्रिब्युशन व्यवसायात प्रवेश केला आहे, असे ते म्हणाले. वाइन व्यवसायातील एक मोठे व्यावसायिक अशोक गर्ग यांच्या मॅगपी ग्रुपमध्ये व्यावसायिक भागिदारी केली, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. सोमय्यांनी तारखांनुसार घटनाक्रम मांडत आरोप केले आहेत. १६ एप्रिल २०२१ रोजी ते गर्ग यांच्या कंपनीत राऊत भागिदार झाले, १२ जानेवारी २०२२ रोजी कंपनीने आणि २७ जानेवारी २०२२!

 

आता कळले संजय राऊत वाईनचे समर्थन का करत होते! – किरीट सोमय्या

• संजय राऊत यांच्या मुलींनी किती महिन्यांआधी व्यावसायिक भागिदारी केली?
• संजय राऊत यांच्या दोन्ही कन्या मॅगपी डीएफएस या कंपनीच्या भागिदार आहेत.
• अशोक गर्ग २००६पासून मॅगपी ग्रुप चालवतात.
• त्यांची मॅगपी ग्लोबल प्रा. लि. वाइन वितरण करते.
• २०१०मध्ये त्यांनी आणखी एक कंपनी सुरु केली.
• यो दोन्ही कंपन्यांचा व्यवसाय हॉटेल, पब्सना वाइन वितरीत करणे आहे.
• मुंबईसह महाराष्ट्रात बहुसंख्य ठिकाणी अशोक गर्गांची कंपनीच वाइन पुरवते.
• अनेक मोठ्या ग्लोबल कंपन्यांची डिस्ट्रिब्युशनशिप आहे.
• १०० कोटींची त्यांची उलाढाल आहे.
• १६ एप्रिल २०२१पर्यंत त्यांचे कुणाशीही जॉइंट व्हेंचर नव्हते
• १६ एप्रिल २०२१ रोजी अशोक गर्ग यांच्या मगपी ग्रुपबरोबर उर्वशी संजय राऊत, विनिता संजय राऊत या मॅगपी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये पार्टनर झाल्या.
• मॅगपी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे आधीचे नाव होते ‘मादक प्रायव्हेट लिमिटेड’
• आता कळले संजय राऊत वाईनचे समर्थन का करत होते.

सोमय्यांनी तारखांनुसार मांडला घटनाक्रम…१६ एप्रिल २०२१, १२ जानेवारी २०२२ आणि २७ जानेवारी २०२२!

  • संजय राऊतांच्या मुलींशी जॉइंट व्हेंचर केल्यानंतर १२ जानेवारी २०२२ रोजी मॅगपी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेडने कंपनी रजिस्ट्रारला लिहिले आम्ही व्यवसाय बदलत आहोत.
  • त्यांनी कळवले आमचा आता मुख्य व्यवसाय सर्व प्रकारच्या वाइन्सची आयात, निर्यात, वितरण करणे हा आमचा व्यवसाय असेल.
  • १६ एप्रिल २०२१ ला वाइन वितरणात एकाधिकार असणाऱ्या ग्रुपच्या कंपनीत राऊतांची भागिदारी झाली.
  • १२ जानेवारी २०२२ला त्या कंपनीने व्यवसाय बदलला आणि ती वाइन व्यवसायात आली.
  • २७ जानेवारी २०२२ला महाराष्ट्रातील आघाडी सरकार वाइन कुठेही विकण्याचा निर्णय घेते.
  • आघाडीचे नेते संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार वाईन ही दारूच नाही वगैरे बाबी मांडत कुठेही वाईन विक्री निर्णयाचे समर्थन करतात.

 

हेही नक्की वाचा:

 

वाइन आणि दारुमध्ये जमीन अस्मानाचा फरक, तेवढाच जेवढा केजी आणि पीजीमध्ये! का ढकलता व्यसनाच्या शाळेत?

 


Tags: Kirit Somaiyamaharashtra governmentsanjay rautWineकिरीट सोमय्यामहाराष्ट्रमहाराष्ट्र सरकारवाइनसंजय राऊत
Previous Post

पालघर जिल्ह्यात एका नव्या पर्वाला सुरुवात! जिजाऊ आणि श्रमजीवी संघटना एकत्र!!

Next Post

डॉ. दीपक सावंत लिखित “वाईल्ड लाईफ फोटोबायोग्राफी” आणि “उद्धव ठाकरे- द टायगर” या दोन पुस्तकांचे प्रकाशन

Next Post
Publication of two books of dr deepak sawant

डॉ. दीपक सावंत लिखित "वाईल्ड लाईफ फोटोबायोग्राफी" आणि "उद्धव ठाकरे- द टायगर" या दोन पुस्तकांचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!