मुक्तपीठ टीम
वाइन ही काही दारू नसते, असे म्हटल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेना नेते संजय राऊतांवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी घणाघाती आरोप केले आहेत. महाराष्ट्र सरकारने वाइन ही किराणा दुकानांमध्येही सहजरीत्या विकण्याचा निर्णय घेण्याच्या काही महिन्यांआधी संजय राऊतांच्या मुलींनी वाइन डिस्ट्रिब्युशन व्यवसायात प्रवेश केला आहे, असे ते म्हणाले. वाइन व्यवसायातील एक मोठे व्यावसायिक अशोक गर्ग यांच्या मॅगपी ग्रुपमध्ये व्यावसायिक भागिदारी केली, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. सोमय्यांनी तारखांनुसार घटनाक्रम मांडत आरोप केले आहेत. १६ एप्रिल २०२१ रोजी ते गर्ग यांच्या कंपनीत राऊत भागिदार झाले, १२ जानेवारी २०२२ रोजी कंपनीने आणि २७ जानेवारी २०२२!
आता कळले संजय राऊत वाईनचे समर्थन का करत होते! – किरीट सोमय्या
• संजय राऊत यांच्या मुलींनी किती महिन्यांआधी व्यावसायिक भागिदारी केली?
• संजय राऊत यांच्या दोन्ही कन्या मॅगपी डीएफएस या कंपनीच्या भागिदार आहेत.
• अशोक गर्ग २००६पासून मॅगपी ग्रुप चालवतात.
• त्यांची मॅगपी ग्लोबल प्रा. लि. वाइन वितरण करते.
• २०१०मध्ये त्यांनी आणखी एक कंपनी सुरु केली.
• यो दोन्ही कंपन्यांचा व्यवसाय हॉटेल, पब्सना वाइन वितरीत करणे आहे.
• मुंबईसह महाराष्ट्रात बहुसंख्य ठिकाणी अशोक गर्गांची कंपनीच वाइन पुरवते.
• अनेक मोठ्या ग्लोबल कंपन्यांची डिस्ट्रिब्युशनशिप आहे.
• १०० कोटींची त्यांची उलाढाल आहे.
• १६ एप्रिल २०२१पर्यंत त्यांचे कुणाशीही जॉइंट व्हेंचर नव्हते
• १६ एप्रिल २०२१ रोजी अशोक गर्ग यांच्या मगपी ग्रुपबरोबर उर्वशी संजय राऊत, विनिता संजय राऊत या मॅगपी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये पार्टनर झाल्या.
• मॅगपी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे आधीचे नाव होते ‘मादक प्रायव्हेट लिमिटेड’
• आता कळले संजय राऊत वाईनचे समर्थन का करत होते.
सोमय्यांनी तारखांनुसार मांडला घटनाक्रम…१६ एप्रिल २०२१, १२ जानेवारी २०२२ आणि २७ जानेवारी २०२२!
- संजय राऊतांच्या मुलींशी जॉइंट व्हेंचर केल्यानंतर १२ जानेवारी २०२२ रोजी मॅगपी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेडने कंपनी रजिस्ट्रारला लिहिले आम्ही व्यवसाय बदलत आहोत.
- त्यांनी कळवले आमचा आता मुख्य व्यवसाय सर्व प्रकारच्या वाइन्सची आयात, निर्यात, वितरण करणे हा आमचा व्यवसाय असेल.
- १६ एप्रिल २०२१ ला वाइन वितरणात एकाधिकार असणाऱ्या ग्रुपच्या कंपनीत राऊतांची भागिदारी झाली.
- १२ जानेवारी २०२२ला त्या कंपनीने व्यवसाय बदलला आणि ती वाइन व्यवसायात आली.
- २७ जानेवारी २०२२ला महाराष्ट्रातील आघाडी सरकार वाइन कुठेही विकण्याचा निर्णय घेते.
- आघाडीचे नेते संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार वाईन ही दारूच नाही वगैरे बाबी मांडत कुठेही वाईन विक्री निर्णयाचे समर्थन करतात.
हेही नक्की वाचा:
वाइन आणि दारुमध्ये जमीन अस्मानाचा फरक, तेवढाच जेवढा केजी आणि पीजीमध्ये! का ढकलता व्यसनाच्या शाळेत?