Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रवादी नेत्यांच्या जावयांच्या मागे भाजपाच्या सोमय्यांचा वक्री ग्रह!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
BJP-NCP

मुक्तपीठ टीम

आजवर राजकीय नेत्यांवर होणारे आरोप आणि प्रत्यारोप नेहमीचेच. त्यात नवे नाही. भाजपाकडून पुराव्यांसह आरोप, ईडी-आयटीचा इशारा आणि मग थेट केंद्रीय यंत्रणांकडून कारवाई, असे नवे सत्र सध्या सुरु आहे. आता भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या सततच्या आरोपांच्या फैरींनंतर एक वेगळाच मुद्दा चर्चेत आला आहे. सोमय्यांच्या घणाघाती आरोपांमुळे केवळ राष्ट्रवादीचे चार प्रमुख नेतेच नाही तर त्यांचे जावईही लक्ष्य झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या चार नेत्यांच्या चार जावयांच्या मागे भाजपा नेते सोमय्यांचा वक्री ग्रह लागला असल्याची मिश्किली सुरु झाली आहे. त्यामुळे आता उरलेल्या नेत्यांच्या जावयांचेही धाबे दणाणण्याची शक्यता आहे.

 

सोमय्यांची जावई हिट लिस्ट

सोमय्या यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार बड्या नेत्यांच्या जावयावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत:
नेता जावई

  • एकनाथ खडसे गिरीश चौधरी
  • नवाब मलिक समीर खान
  • अनिल देशमुख गौरव चतुर्वेदी
  • हसन मुश्रीफ मतीन हसीन मंगोली

एकनाथ खडसे

  • पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणामुळे भाजपातून राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे अडचणीत आले आहेत.
  • याचप्रकरणात खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे.
  • जुलै महिन्यात ईडीने त्यांच्यावर कारवाई करुन कोठडीत पाठवलं.

 

नवाब मलिक

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती.
  • दहा तासांच्या चौकशीनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समीर खान यांना अटक केली होती.

 

अनिल देशमुख

  • या महिन्याच्या सुरुवातीला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेतल होतं.

 

हसन मुश्रीफ

  • किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन यांच्यावर बेनामी कंपन्यांद्वारे पैसे कमावल्याचा आरोप केला आहे.
  • “मतीन हसीन हे ब्रिक इंडिया बेनामीचे मालक आहेत.
  • या कंपनीत ७१८५ शेअर एस यू कॉर्पोरेषन प्रायव्हेट लिमिटेडचे, ९९८ मतीन हसीनचे, तर ९९८ गुलाम हुसेनचे आहेत.
  • म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखे ९८ टक्के शेअर एस यू कार्पोरेशन या बेनामी कंपनीकडे.
  • म्हणजे हसन मुश्रीफ यांनी २०१९-२० मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला, तो इथे पास केला आहे.
  • ब्रिक्स आणि सरसेनापती कारखान्यात ५० कोटींचे व्यवहार झालेत.
  • हे व्यवहार अपारदर्शी आहेत.
  • हे लिलाव कोणत्या पद्धतीने झाले, किती लिलावात सहभागी झाले हे सर्व अपारदर्शी आहेत, असं सोमय्या म्हणाले.

Tags: anil deshmukhEDEknath Khadsehasan mushrifKirit SomaiyaNawab Malikअनिल देशमुखईडीएकनाथ खडसेकिरीट सोमय्यानवाब मलिकहसन मुश्रीफ
Previous Post

पंजाबमध्ये दलित मुख्यमंत्री! काँग्रेसने एकाच बदलात कोणते दोन लक्ष्य साधले?

Next Post

मिलिंद सोमणच्या पत्नीचे कटू अनुभव…कोवळ्या वयात छळ, तारुण्यात अपमान, जोडीदारावरून टोमणे…तरीही सकारात्मकच!

Next Post
milind soman

मिलिंद सोमणच्या पत्नीचे कटू अनुभव...कोवळ्या वयात छळ, तारुण्यात अपमान, जोडीदारावरून टोमणे...तरीही सकारात्मकच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!